पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी हे देशातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे ते अधिक प्रसिद्धीस आले, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगलं काम केलं. विशेष म्हणजे गुजरात राज्याचे ते चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान (Prime Minister) झाल्यानंतर त्यांनी देशाचे हिताचे चांगले अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच भाजप पक्षाचं काम करीत असताना मोदींनी अनेकदा जिथं लोकांना गरज होती. तिथं जाऊन मदत केली. त्यामुळे सुरुवातीपासून ते चर्चेत राहिले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री (Gujarat) असताना केलेल्या कामाची आजही चर्चा होते. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नागरिकांची अधिक काळजी घेतली. गुजरात राज्यामध्ये मोदींनी अधिक चांगले काम केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी गुजरातमध्ये जगन्नाथ यात्रेवर बंदी घातली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आले, कारण मोदींचा बंदीला विरोध होता. त्यानंतर तिथं तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष म्हणजे ज्या दिवशी यात्रा होती. त्या दिवशी तिथल्या सगळ्या भक्तांना पत्रके वाटण्यात आली होती. त्यामध्ये यात्रा कोणत्याही परिस्थितीत व्हायला हवी असं लिहिलं होतं. त्यानंतर इतकं नियोजन करुनही मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी हादरले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींच्या भूमिकेची चौकशी लावली होती.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय घेतला. दोन्ही निर्णय एकदम आव्हानात्मक होते. त्याचबरोबर डिजिटल पेमेंट असलेली कार्यप्रणाली एकदम फास्ट केली. ग्रामीण भागात असलेल्या जनतेला थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी व्यवस्था केली. जनधन आणि आरोग्य योजना सुरु केल्या. त्यामुळे भारतातील करोडो गरीब जनतेला त्याचा फायदा झाला.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 2004 साली झाल्यानंतर त्यांनी तिथल्या ग्रामीण भागातल्या समस्येकडे लक्ष दिलं. म्हणजे कमी मंत्रीमंडळात अधिक काम केले. त्यावेळी फक्त 10 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री होते. गुजरातमध्ये शिक्षणासाठी सुद्धा अधिक चांगलं काम केलं आहे. मोदींनी चांगलं काम केल्यामुळे ते सतत गुजरातमध्ये निवडणुका जिंकत गेले.
मोदींच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रातही खूप प्रयत्न केले गेले आहेत, त्यामुळे देशात 6 लाख 53 हजार शाळा सुरू झाल्या. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत. त्यांनी पायाभूत सुविधांवरती अधिक लक्ष दिलं. विशेष भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे तयार करू शकला आहे. विशेष म्हणजे कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराच्या काळात जनतेला दोन लसी देण्यात मोदी सरकारला यश आले आहे. त्यावेळी 80 कोटी लोकांना मोफत लस वाटप करण्यात आले.