‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींनी दिला आईच्या आठवणींना दिला उजाळा

| Updated on: Jun 30, 2024 | 2:09 PM

लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. तीन महिन्यांत मन की बात बाबत लाखो संदेश आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी नक्की येईन असे मी म्हणालो होतो आणि आज मी तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी आलो आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींनी दिला आईच्या आठवणींना दिला उजाळा
'मन की बात' द्वारे पंतप्रधान मोदींनी साधला देशवासियांशी संवाद
Follow us on

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदा ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला . तब्बल चार महिन्यांनी त्यांनी या कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. या कार्यक्रमाचा हा 111 वा भाग होता. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये त्यांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रमाद्वारे संवाद साधला होता. कार्यक्रमाचा 110 वा भाग होता. गेल्या तीन महिन्यांत मन की बात बाबत लाखो संदेश आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी नक्की येईन असे मी म्हणालो होतो आणि आज मी तुम्हा सर्वांशी बोलायला आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले, संविधानावर आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरील अढळ विश्वासाचा पुनरुच्चार केला आहे, यासाठी मी देशवासियांचे आभार मानतो. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झालेली नाही. या निवडणुकीत 65 कोटी लोकांनी मतदान केले, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या नावाने एक झाड तरी लावलेच पाहिजे, असे ते म्हणाले. मी देखील माझ्या आईच्या नावाने एक झाड लावले आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईला सर्वोच्च स्थान आहे. मातृभूमीचीही काळजी घ्या. तीही आपली आईसारखी काळजी घेते, असे मोदी यांनी नमूद केले.

‘मन की बात’ मधील महत्वाचे मुद्दे :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :

    • भारतातील अशी अनेक उत्पादने आहेत ज्यांना जगभरात मोठी मागणी आहे. भारताचे कोणतेही स्थानिक उत्पादन जागतिक पातळीवर जाताना पाहतो तेव्हा त्याचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. असेच एक उत्पादन म्हणजे अराकू कॉफी. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीता रामा राजू जिल्ह्यात या कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंबे याच्या लागवडीत गुंतलेली आहेत.
    • या महिन्यात संपूर्ण जगाने 10 वा योग दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित योग कार्यक्रमात मीही सहभागी झालो होतो. काश्मीरमध्ये तरूणांसोबत माता-भगिनींनीदेखील योग दिनात उत्साहाने सहभाग घेतला. जसजसा योग दिन साजरा होत आहे, तसतसे नवनवीन विक्रम होत आहेत.
    • कुवेत सरकारने आपल्या राष्ट्रीय रेडिओवर एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे आणि तोही हिंदीत. दर रविवारी ‘कुवैत रेडिओ’वर तो कार्यक्रम अर्धा तास प्रसारित केला जातो. त्यात भारतीय संस्कृतीच्या विविध रंगांचा समावेश आहे. आपले चित्रपट आणि कलाविश्वाशी संबंधित चर्चा तिथल्या भारतीय समुदायात खूप लोकप्रिय आहेत. कुवेतचे स्थानिक लोकही यात खूप रस घेत आहेत, असेही मला सांगण्यात आले. हा अद्भुत उपक्रम सुरू केल्याबद्दल मी कुवेत सरकार आणि जनतेचे मनापासून आभार मानतो.
    • मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळतील. नेमबाजीत आपल्या खेळाडूंची प्रतिभा दिसत आहे. यावेळी आमच्या संघाचे खेळाडू कुस्ती आणि घोडेस्वारी या प्रकारांमध्ये देखील स्पर्धा करतील. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी कधीही भाग घेतला नव्हता.
    • पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकबद्दल चर्चा केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकपासून आमचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त होते.
  • ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पीएम मोदींनी एका खास प्रकारच्या छत्र्यांबद्दलही सांगितले. या छत्र्या केरळमध्ये तयार केल्या जातात, असे त्यांनी नमूद केले. केरळच्या संस्कृतीत छत्र्यांना विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि विधींचा महत्त्वाचा भाग आहे. पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलतोय त्या ‘कार्तुंबी छत्र्या’ आहेत आणि त्या केरळमधील अट्टप्पाडी येथे तयार केल्या जातात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
  • आज, 30 जून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस ‘हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अदम्य धैर्याशी संबंधित आहे. शूर सिद्धो-कान्हू यांनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध दातखिचीत लढा दिला. तेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध हत्यार उपसले होते.
  • ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी आईची आठवण काढली. प्रत्येक व्यक्तीने आईच्या नावाने एक झाड लावलेच पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी माझ्या आईच्या नावानेही एक झाड लावले आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईला सर्वोच्च स्थान आहे. मातृभूमीचीही काळजी घ्या. तीही आपली आईसारखी काळजी घेते. श्रीमंत असो की गरीब, नोकरदार महिला असो की गृहिणी प्रत्येकजण आपल्या आईसाठी झाडे लावत असतो. या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे.
  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व देशवासियांना आणि जगातील सर्व देशातील लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावावे. आईच्या नावाने किंवा तिच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे हे पाहून मला खूप आनंद झाला, असे त्यांनी नमूद केले.