नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर प्रथमचं एका दिवसात 1 लाख रुग्ण समोर आल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिलला सायंकाळी 6.30 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी कोरोना संदर्भात चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. तर केंद्रीय आरोग्यमंत्री 6 एप्रिलला सांयकाळी 6.30 मिनिटांनी 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will take meeting with Chief Ministers due to Second Wave of Corona)
शुक्रवारी झालेल्या बैठकीत देशातील कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांशी चर्चा केली. यामध्ये 11 राज्यांची गंभीर स्थिती असणारी राज्य म्हणून वर्गवारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, चंदीगढ, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि हरियाणाचा समावेश करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वेगानं कोरोन रुग्णसंख्या वाढत आहे.
महाराष्ट्रात रविवारी 57 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 222 रुग्णांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात रविवारी 57 हजार 74 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 30 लाख 10 हजार 597 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील 55878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. मुंबईत रविवारी दिवसभरात 11 हजार 163 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 12 महिलांचा समावेश आहे.
नागपुरात रविवारी 4 हजार 110 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 497 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरात आज पुन्हा एकदा मृतांची संख्या 60 च्या वर पोहोचलीय. 62 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार 606 वर जाऊन पोहोचली आहे. तर 1 लाख 94 हजार 908 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 5 हजार 327 वर जाऊन पोहोचली आहे.
मध्यप्रदेशात रविवारी 3178 रुग्ण आढळले होते. मध्यप्रदेशात 3 लाख 6 हजार 851 रुग्ण आढळले आहेत.मध्य प्रदेशात रविवारी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात मृत्यू झालेल्यांची संख्या 4040 झाली आहे. तर 2 लाख 81 हजार 476 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 21 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कर्नाटकात रविवारी कोरोना 4 हजार 553 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 15 हजार 155 वर पोहोचली आहे. तर, मृतांची संख्या 12625 वर पोहोचली आहे. राज्यात 9 लाख 63 हजार 419 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर, 39 हजार 92 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
लेकीच्या अंगावरील वर्दी पाहून शेतकरी आई-वडील गहिवरले, नाशिकची तेजल आहेर मुंबईत PSI पदी रुजू होणारhttps://t.co/B9urHDMsVj#TejalAaher | #Maharashtra | #MaharashtraPolice | #Nasik
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
संबंधित बातम्या:
35 वर्षांखालील तरुणांचेही कोरोना लसीकरण करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Corona Vaccine | पुण्यात कोरोना लसीकरणाचा उच्चांक, महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद
(Prime Minister Narendra Modi will take meeting with Chief Ministers due to Second Wave of Corona)