संविधान, आरक्षण आणि बंगाल…TV9 च्या Exclusive मुलाखतीत आज PM मोदी या मुद्यांवर उत्तर देणार

| Updated on: May 02, 2024 | 11:56 AM

Lok Sabha Election 2024 चे धुमशान सुरु आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह इंटरव्यू दिला. या मुलाखतीत त्यांनी 'मी त्या मुद्यांना हात घालेल, ज्याबद्दल मी अजून कोणाशीही बोललो नाही' असे सांगत त्यांनी देशातील ज्वलंत मुद्यांवर भाष्य केले.

संविधान, आरक्षण आणि बंगाल...TV9 च्या Exclusive मुलाखतीत आज PM मोदी या मुद्यांवर उत्तर देणार
ज्वलंत मुद्यांवर पंतप्रधान मोदींची सडेतोड उत्तरं
Follow us on

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह इंटरव्यू दिला. त्यांनी अशा अनेक ज्वलंत मुद्यांना हात घातला की ज्यावर देशाने त्यांना कधी चर्चा करताना पाहिले वा ऐकले असेल. या मुलाखतीत त्यांनी ‘मी त्या मुद्यांना हात घालेल, ज्याबद्दल मी अजून कोणाशीही बोललो नाही’ असे सांगत त्यांनी देशातील ज्वलंत मुद्यांवर भाष्य केले. त्यामुळे ही मुलाखत किती स्फोटक, रंजक आणि खास असेल याचा अंदाजा तुम्ही लावू शकता.

पाच संपादकांसोबत मुलाखत

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 भारतवर्षच्या पाच संपादकांसोबत अनेक विषयांवर दीर्घ चर्चा केली. त्यांनी अनेक विषयांना थेट हात घातला. बेधडक प्रश्नांना उत्तरं दिली. TV9 भारतवर्षचा खास कार्यक्रम ‘प्रधानमंत्री And फाईव्ह एडिटर्स’ मध्ये तुम्ही ही तुफान मुलाखत आज रात्री 8 वाजता पाहू शकता. ही मुलाखत तुम्ही https://www.tv9marathi.com/ वर मुलाखतीतील मोठी अपडेट वाचू शकता.

महाराष्ट्राच्या राजकारणावर खास भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुलाखतीत घटना बदलण्यापासून ते विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या सर्व मुद्यांवर त्यांचे मत मांडतील. महाराष्ट्रातील राजकारणावर ते खास भाष्य त्यांनी केले आहे. काही ब्रेकिंग पण त्यांनी दिल्या आहेत. बंगालच्या निवडणुकीविषयी त्यांनी भाष्य केले आहे. इतरही अनेक मुद्यांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. राम मंदिरातील रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा, विरोधकांचे विकासाचे मुद्दे आणि मोदींची गॅरंटी यावर त्यांनी भूमिका मांडली आहे.

एका उत्तरादरम्यान त्यांचे डोळे पाणावले

या मुद्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील राजकारणाविषयी आणि तिथल्या लोकांविषयी चर्चा केली. या पूर्ण मुलाखतीत असा पण पडावा आला ज्यावेळी बंगालशी संबंधित एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदी यांचे डोळे पाणावले.