रॉबर्ट वाड्रा पॉझिटिव्ह, प्रियंका गांधी आयसोलेट; सर्व प्रचारसभा रद्द

| Updated on: Apr 02, 2021 | 3:13 PM

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Priyanka Gandhi in isolation )

रॉबर्ट वाड्रा पॉझिटिव्ह, प्रियंका गांधी आयसोलेट; सर्व प्रचारसभा रद्द
Priyanka Gandhi- robert vadra
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रियंका यांची चाचणी निगेटिव्ह आली असली तर पतीला कोरोना झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत. (Priyanka Gandhi in isolation )

प्रियंका गांधी यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्याने मला आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागत आहेत. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यामुळे मला प्रचाराला येता येणार नाही. तरीही काँग्रेसचा विजय होईल अशी मला आशा आहे, असं प्रियंका यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देशात कोरोनाचा कहर

गेल्या काही दिवसांपासून देशातली कोरोनाची संख्या दिवसे न् दिवस वाढताना दिसत आहे. देशात एका दिवसात 81,466 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,23,03,131 वर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यातील हे सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. 2 ऑक्टोबर 2020 रोजी एकाच दिवसात कोरोनाचे 81,484 नवे रुग्ण सापडले होते.

 

निवडणूक आयोगाला वणक्कम?

आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. प्रिय निवडणूक आयोग, ही काय भानगड आहे? तुम्ही यावर देशासमोर खुलासा करणार आहात का? की निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला वणक्कम असं आम्ही म्हणायचं का? असा खोचक टोला प्रियंका यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाची गाडी खराब, भाजपची नियत खराब आणि लोकशाहीची हालत खराब, अशी टीका राहुल यांनी केली आहे. (Priyanka Gandhi in isolation )

 

संबंधित बातम्या:

 प्रियंका गांधींची चूक भाजप खासदाराने सुधारली!, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

कर्नाटकातील ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार, कोर्टाची परवानगी; येडियुरप्पांना झटका

अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे मोदी सरकारने ‘तो’ आदेश काढला; निर्मला सीतारामन यांची सारवासारव

(Priyanka Gandhi in isolation )