कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, कार्यकर्त्यांची धरपकड; प्रियांका गांधी ताब्यात

| Updated on: Dec 24, 2020 | 12:03 PM

कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसने आज नवी दिल्लीत सुरू केलेलं आंदोलन चांगलंच तापलं आहे. (Priyanka Gandhi, other Congress leaders detained during march to Rashtrapati Bhawan)

कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, कार्यकर्त्यांची धरपकड; प्रियांका गांधी ताब्यात
Follow us on

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसने आज नवी दिल्लीत सुरू केलेलं आंदोलन चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना कृषी कायद्यांना विरोध म्हणून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रियांका यांना ताब्यात घेतलं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना फरफटत व्हॅनमध्ये टाकलं. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तापले आहे. (Priyanka Gandhi, other Congress leaders detained during march to Rashtrapati Bhawan)

काँग्रेस नेते राहुल गांधी हे शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे निघाले आहेत. दुसरीकडे प्रियांका गांधी या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’च्या घोषणा देत या आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने आंदोलकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी फरफटतच या आंदोलकांना व्हॅनमध्ये डांबले. त्यामुळे येथील वातावरण अधिकच चिघळले असून पोलिसांनी आंदोलन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, राहुल गांधी आज कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रपती भवनाच्या दिशेने पायी मार्च काढणार आहेत. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली आहे. आम्ही या मार्चला परवानगी दिलेली नाही. ज्या नेत्यांना राष्ट्रपती भवनाने भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यांनाच केवळ राष्ट्रपती भवनाकडे जाता येणार आहे, असं नवी दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्ताने सांगितलं. राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार आहेत. यावेळी ते राष्ट्रपतींना 2 कोटी शेतकऱ्यांचं निवेदन देणार आहेत. (Priyanka Gandhi, other Congress leaders detained during march to Rashtrapati Bhawan)

 

संबंधित बातम्या:

LIVE : सरकारच्या विरोधात प्रियांका गांधी रोडवर बसल्या आंदोलनाला

राहुला गांधींच्या पायी मार्चला परवानगी नाकारली; दिल्लीत कलम 144 लागू

राहुल गांधी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?

(Priyanka Gandhi, other Congress leaders detained during march to Rashtrapati Bhawan)