नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश सरकारवर भडकल्या आहेत. माझ्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केलं जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडे दुसरा काही कामधंदा नाहीये का? असा सवाल संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात सध्या फोन टॅपिंगचा मुद्दा तापला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात फोटन टॅप केले जात आहेत. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपलं फोनवरील संभाषण ऐकत असतात असा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे. हा आरोप ताजा असतानाच प्रियंका गांधी यांनी नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
सरकारला दुसरं काम नाहीये का? राज्याचा विकास करावा, लोकांच्या समस्यांवर मार्ग काढावा, अत्याचार करणाऱ्यांना रोखावं या सर्व गोष्टी सरकारने केलं पाहिजे. पण हे सर्व सोडून इन्स्टाग्राम हॅक करण्यात आणि फोन टॅपिंग करण्यात हे सरकार व्यस्त आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
यावेळी प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयागाज येथील कार्यक्रमावरही टीका केली. मोदी आज प्रयागाज येथील महिला सशक्तीकरण संमेलनात सहभागी झाले होते. मी मुलगी आहे. लढू शकते म्हणूनच मोदींना आज महिलांची दखल घ्यावी लागली. त्यांच्यासाठी काम करावं लागत आहे. पण आता महिला जाग्या झाल्या आहेत. या देशातील महिला शक्तीसमोर मोदी झुकले आहेत. हा उत्तर प्रदेशातील महिलांचा विजय आहे. त्यामुळे मी खूश आहे, असं त्या म्हणाल्या.
आमचे फोन कॉल्स ऐकले जात आहेत. सपा कार्यालयातील सर्वच फोन ऐकले जात आहेत. मुख्यमंत्रीच ही फोन रेकॉर्डिंग ऐकत आहेत. तुम्ही (पत्रकार) आमच्याशी संपर्क केल्यास तुमचाही फोन टॅप केला जाईल हे समजून जा. त्यामुळे हे सरकार किती निरुपयोगी आहे हे दिसून येतं, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 21 December 2021#Fastnews #news #Headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/jYbWvQUahN
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! 20 Youtube Channel आणि 2 वेबसाईट्सवर केंद्राची बंदी!