नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड तयारी केली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खिळे टाकण्यात आले आहेत तर काही मार्गांवर भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Priyanka Gandhi Vadra tweeted, Prime Minister, war with your farmers?)
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. केंद्र सरकारने पूल बांधावेत. भिंती नव्हे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटमधून लगावला आहे. तर, पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
कुठे खिळे तर कुठे भिंती
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवया रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले असून अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत. या शिवाय जमावाने दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमेभोवती एक प्रकारची तटबंदीच करण्यात आली आहे. त्यावरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना नेते गाझीपूर सीमेवर
दरम्यान, शेतकरी आंदोलन तापलेलं असतानाच आज शिवसेना नेते गाझीपूरच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे चार खासदार गाझीपूर सीमेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे, असं राऊत यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार नको
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांशी चर्चा करतील तेव्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर काळ्या कृषी कायद्याची टांगती तलवार असता कामा नये. त्यामुळे हे कायदे रद्द करूनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे राऊत यांनी म्हटले. शेतकरी हा काही राजकारणी नाही. तो त्याच्या भावी पिढ्यांसाठी लढतोय. हे शेतकरी कोणत्या प्रांताचे, धर्माचे किंवा जातीचे आहेत, हे महत्त्वाचे नाही. हा राष्ट्रीय लढा आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. (Priyanka Gandhi Vadra tweeted, Prime Minister, war with your farmers?)
प्रधानमंत्री जी, अपने किसानों से ही युद्ध? pic.twitter.com/gn2P90danm
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 2, 2021
संबंधित बातम्या:
विरोधक म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे परत घ्या, मोदी म्हणाले…
‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या
उद्धव ठाकरेंच्या सूचनेने गाझीपूर सीमेवर, संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार
(Priyanka Gandhi Vadra tweeted, Prime Minister, war with your farmers?)