राजधानी दिल्लीमध्ये अनेकदा मोठे आंदोलनं झाले.विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी दिल्लमध्ये आंदोलन करत आपल्या विविध मागण्या आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. यातील अनेक आंदोलनाला यश देखील आलं. मात्र रविवारी दिल्लीच्या जवाहर लाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर एक असं आंदोलन झालं, जे चर्चेचा विषय बनलं. आंदोलकांनी दिलेल्या घोषणा आणि त्यांच्या हातात असलेलं पोष्टर सर्वजण बघतच राहिले. हे आंदोलन होतं पत्नी पीडित पतींचं. शादी के खेल में, ‘पती जाएगा जेल में, बीबी करे तो प्यार पती करे तो बलात्कार, पत्नी के प्यार में, पती गया तिहाड में’अशा घोषणा यावेली आंदोलकांनी दिल्या. हातात पोस्टर घेऊन त्यांनी जोरदार आंदोलन केलं.
दिल्लीच्या जवाहर लाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये अंदाजे 75 लोक सहभागी झाले होते.त्यांच्या हातात विविध घोषणांचे पोष्टर देखील होते. जे व्यक्तींना कोणत्यानं कोणत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीनं छळलं आहे, असे अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनात तर काही जण असे होते, की ते आपल्या पत्नीमुळे अनेक वर्ष आपल्या मुलांना देखील भेटू शकले नव्हते.काही जणांना त्यांच्या पत्नीनं घराबाहेर काढल्यामुळे त्यांच्यावर स्वत:च घर असताना देखील किरायाच्या घरात राहण्याची वेळ आली होती.
वैवाहिक बलात्कारा संदर्भात प्रस्तावित कायद्याला विरोध करण्यासाठी हे सर्वजण एकत्र आले होते. त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे जर विधयेक पास झालं तर घरात राहणाऱ्या पुरुषांवर बलात्काराचे आरोप लावून त्यांना जेलमध्ये जावं लागू शकतं अशी भीती आंदोलकांना वाटत आहे.