PUBG Murder: प्रकरण वेगळ्याच वळणावर.. प्रॉपर्टी डिलर अंकल मम्मीला भेटण्यासाठी येत असत.. पप्पा म्हणाले होते, मी असतो तर बंदूक उचलून गोळी मारली असती..

| Updated on: Jun 17, 2022 | 2:06 PM

घरात काय सुरु आहे, याची पूर्ण कल्पना पप्पांना होती. पप्पा चिडचिड करत मात्र काहीच करु शकत नव्हते. म्हणून मीच आईला गोळी मारली. त्याचसाठी पप्पा मला फोनवर म्हणाले की, तु तुझ्या आईला मारुन टाकले, पण आता घरात शांतता आहे.

PUBG Murder: प्रकरण वेगळ्याच वळणावर.. प्रॉपर्टी डिलर अंकल मम्मीला भेटण्यासाठी येत असत.. पप्पा म्हणाले होते, मी असतो तर बंदूक उचलून गोळी मारली असती..
PunbG case new turn
Image Credit source: social media
Follow us on

लखनौ – उ. प्रदेशची राजधानी लखनौत (Lucknow)झालेल्या आईच्या हत्याकांड (Boy Killed mother)प्रकरणात दररोज नवनवे गौष्यस्फोट होत आहेत. PUBG पासून सुरु झालेलं हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन थांबलं आहे. अल्पवयीन मुलगा घरात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री (third man entry)होत असल्याचे सांगत हत्या योग्य असल्य़ाचे सांगत आहे. मात्र आत्ताआत्तापर्यंत दोघांमध्ये सतत होत असलेल्या वादातूनच त्याने आपल्या आईला गोळी मारल्याचे तो सांगत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या आईषी सातत्याने होत असलेल्या वादातून अल्पवयीन मुलाने गोळी मारुन तिची हत्या केली, हे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. मात्र नंतर जसजसा तपास सुरु झाला आणि वेळ जाऊ लागला, तसतसा या प्रकरणात नवीन माहिती हाती आली आणि तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली. याच कारणामुळे या हत्येची योजना तयार करण्यात आली असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे.

मम्मीला भेटण्यासाठी प्रॉपर्टी डीलर अंकल येत असत

या अल्पवयीन आरोपीने बाल कल्याण समितीच्या चौकशीत सांगितले की – जेव्हा पप्पा नसत, तेव्हा मम्मीला भेटण्यासाठी प्रॉपर्टी डीलर अंकल येत असत. ते पाहून आपल्याला वाईट वाटत असे. याची तक्रार एक दिवस आपण पप्पांकडे केली होती. यानंतर पप्पा आणि मम्मीत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर मम्मीने मला खूप मारले होते. तेव्हापासून आईबद्दल मनात राग होता.

पप्पा म्हणाले तुला वाटेल ते कर

एक दिवस प्रॉपर्टी डीलर अंकल डीनरसाठी घरी आले. हे मला अजिबात आवडले नाही. मी त्यादिवशी जेवलो नाही. याची तक्रार मी पुन्हा एकदा पप्पांकडे केली. या कारणामुळे आईने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि मला खूप मारले. पप्पांना मी सांगितले की हे मला अजिबात आवडत नाहीये. त्यावर पप्पा म्हणाले होते की, मी असतो तर बंदूक उचलून गोळी मारली असती. हे मी ऐकले आणि त्यांना विचारले की मी काय करु, त्यावर पप्पा म्हणाले तुझ्या मनात आहे ते तू कर.

हे सुद्धा वाचा

तत्कालीन कारण

काही दिवसांनी मम्मीचे 10 हजार रुपये गायब झाले. जे मी घेतले नव्ते तरी मला आईच्या हातचा खूप मार खावा लागला. तरी मी मूग गिळून गप्प बसलो. मला आईने रात्री जेवायलाही दिले नाही. मी रात्रभर उपाशी राहिलो. तेव्हा मी ठरवले की याचा बदला घेईन त्यानंतरच जेवीन. त्या दिवशी रात्री मी आई आणि लहान बहीण झोपलेलो होतो. मी उठलो. बंदूक काढली आणि आईला गोळी मारली.

पप्पांना घरात काय चाललंय याची क्लपना होती

घरात काय सुरु आहे, याची पूर्ण कल्पना पप्पांना होती. पप्पा चिडचिड करत मात्र काहीच करु शकत नव्हते. म्हणून मीच आईला गोळी मारली. त्याचसाठी पप्पा मला फोनवर म्हणाले की, तु तुझ्या आईला मारुन टाकले, पण आता घरात शांतता आहे.लखनौच्या पीजीआय पोलीस ठाण्याच्या परिसरात यमुनापुरम कॉलनीत एका 16 वर्षांच्या मुलाने 4 जून रोजी आपल्या आईला गोळी मारली होती. त्यानंतर तिचा मृतदेह दोन ते तीन दिवस त्याने घरातच ठेवला होता. त्यानंतर तीन दिवसांनी प. बंगालमध्ये आसनसोल येथे लष्करात कार्यरत असलेल्या वडिलांना त्याने ही घटना सांगितली होती. ही घटना घडली तेव्हा त्याची 9 वर्षांची लहा बहीणही घरात होती. तिला धमकावून त्याने दुसऱ्या खोलीत बंद केले होते. तर आईच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरु नये म्हणून रुम फअरेशनरचा वापर केला होता. आत्तापर्यंत या प्रकरणात मुलाला पबजीचे व्यसन होते, आई खेळण्यापासून रोखत असल्याने त्याने तिला गोळी मारल्याचे सांगण्यात येत होते. या अल्पवयीन मुलाने आईला मारण्यासाठी वडिलांच्या लायसन्स असलेल्या बंदुकीचा वापर केला होता.