नवी दिल्ली: पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षानं (AAP) सत्ता स्थापन केली आहे. आपनं भगवंत मान (Bhagwant Mann) यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये 23 मार्च रोजी शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन क्रमांक जारी करणार असल्याचं म्हटलं आहे. भगवंत मान यांनी 23 मार्चला शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे, असं म्हटलंय. त्या हेल्पलाईनमध्ये माझा देखील मोबाईल क्रमांक असेल, असं मान यांनी स्पष्ट केलंय. पंजाबमध्ये जर कोणी तुम्हाला लाच मागितली तर त्यांना नकार देऊ नका, त्यांचं व्हिडीओ आणि ऑडिओ बनवून मला पाठवा, असं भगवंत मान यांनी म्हटलं. माझं कार्यालय त्या प्रकरणाची चौकशी करेल, असं देखील ते म्हणाले.
Punjab’s new CM Bhagwant Mann announces that an anti-corruption helpline will be launched on 23rd March, Shaheed Diwas. People of the state will be able to lodge complaints on corruption via WhatsApp. pic.twitter.com/RD6qo19PPs
— ANI (@ANI) March 17, 2022
भगवंत मान यांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्याच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. हे पाऊल पंजाब राज्यासाठी ऐतिहासिक ठरेल असं ते म्हणाले होते. दिल्ली प्रमाणं आम आदमी पार्टीचं पंजाबमधील सरकार भ्रष्टाचाराविरोधात कडक पावलं उचलण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाची स्थापना देखील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाली होती. त्यामुळं पंजाबमधील आप सरकार देखील आता भ्रष्टाचार प्रकरणातील कारवाई तीव्र करण्याची शक्यता आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी पहिल्या बैठकीला संबोधित केलं. यासंदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती दिली आहे. राज्यातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत लोकसेवकाप्रमाणं वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाद्वारे भगवंत मान यांचा नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील संबंध चागंले राहावेत असा प्रयत्न दिसतो. नवी दिल्लीत देखील आपची लोकप्रियता वाढण्याचं देखील एक कारण होतं.
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भ्रष्टाचार आज एक मोठा मुद्दा आहे. आपनं निवडणूक प्रचारादरम्यान यासंदर्भात आश्वासन दिलं होतं. पजाबसह देशाच्या काही भागांमध्ये नागरिकांकडून विविध कारणांसाठी लाच मागितली जाते, त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो, असं ते म्हणाले. तर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी देखील आप सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन केलं आहे.
इतर बातम्या :
Best Holi Songs: रंगांची उधळण करताना थिरकायला लावणारी ‘ही’ टॉप 5 गाणी
Holi Celebration | होळीनिमित्त Nandurbarमध्ये साखरेच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा