चंदीगढ – पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील चन्नी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, आज मध्यरात्रीपासून पंजाबमध्ये पेट्रोल, डिझेलचे सुधारीत दर लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी दिली आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असे बोलेले जात आहे. चंदीगढमध्ये या आधीच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्र सरकारकडून देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत, आता राज्य सरकारने देखील किमती कमी कराव्यात असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात येत होते. अखेर पंजाबमधील चन्नी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरानुसार पेट्रोल भाव प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलचे भाव प्रति लिटर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
पंजबा सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रिय निर्णय घेताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच वीज देखील प्रती युनिट तीन रुपयांनी स्वस्त केली होती. आता पुन्हा एकदा असाच निर्णय पंजाब सरकारकडून घेण्यात आला असून, नव्या निर्णयानुसार पंजाबमध्ये पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
We have decided to decrease petrol and diesel prices by Rs 10 per litre and Rs 5 per litre, respectively, to be effective from midnight today: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/Q3PP1scPeo
— ANI (@ANI) November 7, 2021
संबंधित बातम्या
ई-श्रम पोर्टलवर फोटो अपडेट कसा कराल, जाणून घ्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया
सोन्याची खरेदी करताय, विक्रेता बनावट बिल तर देत नाही ना, खात्री कशी कराल?