Golden Temple | पावित्र्य भंग केल्याचं प्रकरण! गोल्डन टेम्पलनंतर आता ‘इथं’ही संशयिताला इतकं मारलं की तो मेलाच

| Updated on: Dec 19, 2021 | 5:12 PM

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मंदिराचं पावित्र्य भंग करण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. शिवाय जे कुणी असं कृत्य करतील त्यांना 10 वर्षांच्या सश्रम कारावासी शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

Golden Temple | पावित्र्य भंग केल्याचं प्रकरण! गोल्डन टेम्पलनंतर आता इथंही संशयिताला इतकं मारलं की तो मेलाच
Follow us on

गोल्डन टेम्पलमधील (Golden Temple) एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियात तुफान वायरल झाला. या व्हिडीओमध्ये एकानं लोकांच्या आस्थेला ठेस पोहोचवल्यानं त्याला लोकांनी बदडलं होतं. मंदिरातील लोकांनी पावित्रता भंग करणाऱ्याला इतकं मारलं होतं, की त्यातच संशयिताचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता अशीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. गोल्डन टेम्पलनंतर पंजाबच्या कपूरथला मंदिरातही एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालाय. या दोन्ही घटनांबाबत चित्र-विचित्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

कपूरथलामध्ये काय घडलंय?

पंजाब राज्यातील कपूरथला हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात 19 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. कपूरथला मंदिराचं पावित्र्य भंग करणाऱ्या एका आरोपीला जमावानं मारहाण केली, असं सांगितलं जातंय. ही मारहाण इतकी भयंकर होती, की संशयित आरोपीचा त्यातच मृत्यू झालाय.

या युवकाला केल्या जाणाऱ्या मारहाणीचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्याला मारहाण केली जातेय, तो जमिनीवर पडून असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही जण बांबूनं त्यावर एकामागोमाग एक फटके देत असल्याचं दिसून येतंय. या सगळ्यादरम्यान, बांबूच्या फटक्यांनी आरोपी वारंवार विव्हळतोय. पण भावना दुखावल्यानं संतप्त झालेल्या लोकांनी संशयिताला जीव जाईपर्यंत मारल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, गुरुद्वाराचे कार्यवाह अमरजीत सिंह यांनी युवकाला केलेल्या मारहाणीचं समर्थन करताना म्हटलंय की,…

मी चार वाजता सकाळी प्रार्थनेसाठी निघालो होतो. तेव्हा एकजण आमच्या देवाचा अपमान करत होता. त्याला मी हटकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण काही लोकांनी त्यांना अडवलं आणि पकडून ठेवलं!

मारहाणीमध्ये जीव गेलेल्या तरुणाला दिल्लीतून पाठवण्यात आलं होतं, असा दावा अमरजीत यांनी केल्याचं एका वेबसाईटनं म्हटलंय. त्यांच्या दाव्यानुसारच याच तरुणाच्या बहिणीचाही अशाप्रकारे जीव घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

मृत्यूबाबतच गूढ कायम

दरम्यान, या सगळ्यात बादशाहपूर पोलिसांचं पथही घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी युवकाची जमावाच्या ताब्यातून सुटका केली. पोलिसांनी युवकाची चौकशीही केली. मात्र, मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाण्यात आलेली नाही. या सगळ्यात पोलिसांनी जमावासमोर युवकाची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली होती.

अशातच हे सगळं प्रकरण एका सिलिंडर चोरीशीही जोडलं जातंय. त्याअनुशंगानंही पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत. मात्र अद्याप या तरुणाच्या मृत्यूबाबतही गूढ कायम आहे. पोलिसांनी या युवकाला रुग्णालयात दाखल केलं होतं की नाही, याबाबतही शंका घेतली जाते आहे.

राजकीय पडसाद

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मंदिराचं पावित्र्य भंग करण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. शिवाय जे कुणी असं कृत्य करतील त्यांना 10 वर्षांच्या सश्रम कारावासी शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. या घटना रोखण्यासाठीच पंजाबमध्ये 2018 साली एक विधेयक संमत करण्यात आलं होतं. मात्र ते अजूनही लागू झालेलं नाही. मात्र गोल्डन टेम्पलच्या घटनेनंतर आता एसआयटी स्थापन कऱण्यात आली असून दोन दिवसांत याबाबतचा अहवाल समोर आणला जाणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांतल्या या दोन्ही घटनानंतर गोल्डन टेम्पल आणि संवेदनशील स्थळांजवळ पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिस याबाबत अधिक तपास करत असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलंय. तर दुसरीकडे गोल्डन टेम्पलमधील घटनेची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केलाय. या संपूर्ण घटनेचे तीव्र राजकीय पडसादही आत उमटायला सुरुवात झाली आहे.

 

पाहा व्हिडीओ – 

 

इतर बातम्या – 

Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!

मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली ‘मन की बात’

भाऊच ठरला कर्दनकाळ, उपचाराला खर्च लागतो म्हणून संपविले, मतिमंद भावाची गळा दाबून हत्या!

42 लेकरांचे खून पचवणाऱ्या रेणुका शिंदे-सीमा गावितचं भवितव्य ठरणार, फाशी टाळण्यासाठी बहिणींचा आटापिटा