चंदीगड – प्रसिद्ध पंजाबी गायक (Panjabi Singer)सिद्धू मुसेवाला (Siddhu Musewala)याची भरदिवसा हत्या (shot dead)करण्यात आली आहे. त्याच्यावर मनसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचे दोन साथीदार जखमी झाले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला याची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला याच्याकडे आधी ८ ते १० सुरक्षारक्षक होते. कालपासून सुरक्षा कमी केल्यानंतर मुसेवाला याच्या संरक्षणासाठी केवळ दोनच गनमॅन ठेवले होते. प्राथमिक माहितीनुसार मुसेवाला त्याच्या साथीदारांसह गाडीतून जात होता. त्यावेळी काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. घरापासून पाच किमी अंतरावर असतानाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी मुसेवाला हा स्वताच गाडी ड्राईव्ह करीत होता.
Congress leader Sidhu Moose Wala shot dead in Punjab’s Mansa day after security withdrawn
Read @ANI Story | https://t.co/We5yspggLy#sidhumoosewala #Congress #Punjab pic.twitter.com/7bXkDyK2mW
हे सुद्धा वाचा— ANI Digital (@ani_digital) May 29, 2022
सिद्धू मुसेवाला हा पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत मानसा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर आम आदमी पार्टीच्या डॉ. विजय सिंगला यांच्याविरोधात निवडणूक लढला होता. मुसेवाला या निवडणुकीत पराभूत झाला, आणि त्याला हरवणारे सिंगला हे राज्याचे आरोग्यमंत्री झाले. नुकतेच सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात मुख्यमंत्री मान यांनी त्यांची मंत्रीपदावरुन त्यांची उचलबांगडी केली होती. आता सिद्धू याच्या निधनानंतर हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का असल्याचे ट्विट काँग्रेसने केले आहे.
The murder of Shri Sidhu Moose Wala, Congress candidate from Punjab & a talented musician, has come as a terrible shock to the Congress party & the entire nation.
Our deepest condolences to his family, fans & friends.
We stand united & undeterred, at this time of extreme grief. pic.twitter.com/v6BcLCJk4r
— Congress (@INCIndia) May 29, 2022
कालच सिद्धू मुसेवाला याने आपल्या वकिलांना फोन केला होता. त्यावेळी आपल्या जीवाला धोका आहे, असे त्याने वकिलांना सांगितले होते. पंजाब सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सुरक्षा कमी केल्याचेही त्याने सांगितले. आता सुरक्षेसाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल असेही त्याने सांगितले होते.
सिद्धूवर गाण्यात गन कल्चर प्रमोट करण्याचे आरोप करण्यात आले होते.
पोलीस फयरिंग रेंजमध्ये एके ४७ रायफलमधून निशाणेबाजी करताना तो दिसला होता
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश, मत्र निवडणुकीत पराभूत