चंदीगड: आखेर आज पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह लवकरच जाहिर करण्यात येईल असं ते म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा स्वतः केली. आपला नवाीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलं. (punjabs ex cm amrinder singh new party will not tie with bjp to share seats and fight election)
ते पुढे म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व 117 जागांवर लढेल. “वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व 117 जागा लढवू, मग ते जागा वाटपातून असो किंवा स्वबळावर,” अमरिंदर सिंग म्हणाले.
When the time comes we will fight all 117 seats, whether adjustment seats or we contest on our own: Former Punjab CM Captain Amarinder Singh pic.twitter.com/0Foi9kmTO7
— ANI (@ANI) October 27, 2021
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करुन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा नवीन पक्ष भाजपासोबत युती करणार नाही पण, भाजपासोबत जागावाटप करेल.
You wanted to close doors on me, as i was raising voice of the People, speaking truth to power !
Last time you formed your own party, you lost your ballot, garnering only 856 votes … People of Punjab are again waiting to punish you for compromising on the interests of Punjab !!— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) October 27, 2021
दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ 856 मतं मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत,” अशी टीका सिद्धू यांनी केली आहे.
इतर बातम्या
punjabs ex cm amrinder singh new party will not tie with bjp to share seats and fight election