पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने सुलतानपूरमधील करवल खीरी, पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरले. 341 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस हायवे आणि त्यावरील तयार केलेलं इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिपचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. हा देशातला पहिला हायवे आहे ज्याचावर इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिप तयार केली गेली आहे.
थोड्याच वेळात या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचा एयर शो होणार आहे. C-130J विमानाद्वारे, भारतीय हवाई दलाचे गरूड कमांडो आणि विशेष दलातील कमांडो ग्रुप इन्सर्शन ड्रिल करतील. त्याचबरोबर सुखोई, जग्वार आणि मिराज ही विमाने हवेत त्यांचे उडण्याचे कौशल्य दाखवतील. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची तीन विमाने तिरंगी सादरीकरण करतील.
Prime Minister Narendra Modi’s reaches Karwal Kheri in Sultanpur district to inaugurate the 341 Km long Purvanchal Expressway, shortly pic.twitter.com/PcXJDUnAJk
— ANI UP (@ANINewsUP) November 16, 2021
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध राज्यांमध्ये आणखी 19 आपत्कालीन लँडिंग स्ट्रिप तयार केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राजस्थानमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 3, तामिळनाडूमध्ये 1, आंध्र प्रदेशमध्ये 2, गुजरातमध्ये 2, हरियाणामध्ये 1, पंजाबमध्ये 1, जम्मू-काश्मीरमध्ये 1 आणि आसाममध्ये 5 आपत्कालीन लँडिंगचा समावेश आहे.
बहुपक्षीय विकास का सेतु ‘पूर्वांचल एक्सप्रेस-वे’ सुगम यात्रा का माध्यम बनने के साथ ही उ.प्र. की अर्थव्यवस्था की रीढ़ भी बनेगा।
निःसंदेह, यह एक्सप्रेस-वे आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में प्रदेश को 1 ट्रिलियन USD इकोनॉमी बनाने के संकल्प को पूर्ण करने में सहायक सिद्ध होगा। pic.twitter.com/1yLzwH78WI
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 16, 2021
हे ही वाचा