नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यानंतर काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) हिंसेचं नाव बदलून मास्टरस्ट्रोक ठेवण्यात आलंय, असं म्हणत राहुल गांधींनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘हिंसा प्रदेश’ झालाय, असा आरोप काँग्रेसने केलाय (Rahul Gandhi and Priyanka Gandhi criticize Yogi government over violence in UP).
उत्तर प्रदेश में ‘हिंसा’ का नाम बदलकर ‘मास्टरस्ट्रोक’ रख दिया गया है। pic.twitter.com/poT0aOxxBD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 10, 2021
दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील ट्विट करत उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “सरकार तेच, वर्तनही तेच.” प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी म्हटलं, “काही दिवसांपूर्वी एका बलात्कार पीडितेने भाजप आमदाराविरोधात आवाज उठवला. त्यानंतर या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आता एक महिलेचा उमेदवारी अर्ज रोखण्यासाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या.”
कुछ सालों पहले एक बलात्कार पीड़िता ने भाजपा विधायक के खिलाफ आवाज उठाई थी, उसे व उसके परिवार को मारने की कोशिश की गई थी।
आज एक महिला का नामांकन रोकने के लिए भाजपा ने सारी हदें पार कर दीं।
सरकार वही।
व्यवहार वही। pic.twitter.com/rTcGQiG3Ai— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 10, 2021
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘हिंसा प्रदेश’ झाल्याचा आरोप केला.
जनता ने वोट देकर बीडीसी चुने, योगीजी के जंगलराज ने गोली, बम, पत्थर, लाठी चलाकर उन्हें धमकाया, उनका अपहरण किया, महिला सदस्यों के साथ बदतमीजी की
वोट की ताकत वाले जनतंत्र पर योगीजी का जंगलराज हावी हो गया है। उन्हें ध्यान रखना चाहिए यह देश, इसका लोकतंत्र, इसकी जनता उनसे बड़ी है। pic.twitter.com/674H0PtR78
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 10, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी लाठीकाठ्यांपासून बॉम्बपर्यंत वापर होऊन हिंसा भडकली. विशेष म्हणजे या परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासनावरही हल्ले होताना दिसत आहेत.
VIDEO: “भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल#UP #UPViolence #AttackOnPolice pic.twitter.com/GKARBSEcux
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 11, 2021
पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. त्यात ते फोनवर वरिष्ठांशी बोलताना परिस्थितीची माहिती देत आहेत. ते सांगत आहेत, “हे लोक विटा आणि दगडफेक करत आहेत. त्यांनी मला थोबाडीतही मारली. त्यांनी त्यांच्यासोबत बॉम्बही आणले आहेत. हे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. यात भाजप आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे.” हा व्हिडीओ ईटवाह जिल्ह्यातील आहे.