लोकसभा निवडणुकीत देशात दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. या दोन्ही पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा देशभर होत आहेत. भाजपने ‘400 पार’ चा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी भाजप उमेदवारासाठी सभा घेत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांनी भाजपला सत्तेतून खाली ओढण्यासाठी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. परंतु या दरम्यान एक वेगळीच घटना घडली. ते ज्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आले होते, त्या भाजप उमेदवाराचा फोटो त्यांच्या व्यसपीठावर लागला होता. हा प्रकार लक्षात येताच तातडीने त्या फोटोला झाकून दुसरा फोटो लावण्यात आला. मध्य प्रदेशातील ही घटना आहे.
लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान एका फोटोची चर्चा होत आहे. मध्य प्रदेशातील मांडला लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले होते. मांडलामधील धनोरा गावात त्यांची प्रचारसभा ठेवण्यात आली होती. काँग्रेस उमेदवार ओंकार सिंह मरकाम यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांच्याविरोधात राहुल गांधी मते मागणार होते. परंतु प्रचार सभेतील व्यासपीठावर केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा फोटो लावला होतो.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा फोटो लावला असला तरी नाव नव्हते. परंतु ही चूक लक्षात येताच फग्गन सिंह कुलस्ते यांच्या फोटोवर कापडा लावण्यात आले. त्याच्या ठिकाणी आमदार रजनीश हरवंश यांचा फोटो लावण्यात आला. परंतु या प्रकारामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांची चांगलीच पंचायत झाली होती. राहुल गांधी यांच्या प्रचारसभेच्या एका दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमधून प्रचार सुरु केला होता. नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला होता.
#WATCH | Madhya Pradesh: Before Congress MP, Rahul Gandhi's address today at the election rally in Dhanora village of Mandla Lok Sabha in favour of Congress candidate Omkar Singh, the flex that was being put up on the main stage had the picture of Union Minister & BJP candidate… pic.twitter.com/I5drf8uJog
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 8, 2024
केंद्रीय मंत्री खासदार फग्गन सिंह कुलस्ते सहा वेळा निवडून आलेले आहे. त्यांच्या विरोधात डिंडोरी येथून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ओंकार सिंह मरकाम मैदानात आहे. मध्य प्रदेशात चार टप्प्यात मतदान होत आहे. त्यात पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे रोजी तर चौथा टप्पा 13 मे रोज होणार आहे.