नवी दिल्ली : केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं, “मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही!” यावेळी त्यांनी कोरोना लसी कुठं आहेत असाही सवाल केला. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केलाय. यात लसीकरणाविषयीची आकडेवारी देण्यात आलीय (Rahul Gandhi criticize Narendra Modi over corona vaccine shortage).
राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या फोटोमधील आकडेवारीनुसार, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येला कोरोना विरोधी लसीकरणाचे 2 डोस देणं आवश्यक आहे. याप्रमाणे दररोज किमान 88 लाख जणांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र मागील 7 दिवसात दररोज सरासरी केवळ 34 लाख जणांनाच लसीकरण दिलं जातंय. दुसरीकडे मागील 7 दिवसात दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा आहे.
मंत्रियों की संख्या बढ़ी है,
वैक्सीन की नहीं!#WhereAreVaccines pic.twitter.com/gWjqHUVdVC— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 11, 2021
शनिवारी (10 जुलै) एका दिवसात एकूण 37 लाख जणांना लस देण्यात आली. त्यामुळे 60 टक्के लसीकरणासाठी 54 लाख लसी कमी पडल्या. राहुल गांधी यांनी याआधी देखील वारंवार कोरोना लसींच्या तुटवड्यावरुन मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जुलै महिना आला, पण लस आली नसल्याचं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
मागील महिन्यात राहुल गांधी यांनी जनतेला मोदी सरकारची खोटी आश्वासनं आणि घोषणा नको आहेत, तर लवकरात लवकर पूर्ण लसीकरण हवंय, असं म्हणत टीका केली होती.
Rahul Gandhi criticize Narendra Modi over corona vaccine shortage