खासदारकी रद्द करा, तुरुंगात टाका, गप्प बसणार नाही, राहुल गांधी आक्रमक; थेट पंतप्रधानांवरच हल्लाबोल

| Updated on: Mar 25, 2023 | 1:25 PM

मी साडेचार महिने भारत जोडो यात्रेत लोकांसोबत होतो आणि राहणार. विरोधकांचं काम आहे लोकांमध्ये राहणार आहे, असं सांगतााच हे ओबीसींचं प्रकरण नाही. हे मोदी आणि अदानीच्या संबंधाचं प्रकरण आहे.

खासदारकी रद्द करा, तुरुंगात टाका, गप्प बसणार नाही, राहुल गांधी आक्रमक; थेट पंतप्रधानांवरच हल्लाबोल
Rahul Gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. माझी खासदारकी रद्द करून मी गप्प बसेन असं तुम्हाला वाटत असेल. पण मी गप्प बसणार नाही. मी बोलतच राहणार. मी सवाल करतच राहणार असं सांगतानाच हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. तसेच मोदी आणि अदानी यांचे संबंध काय आहेत? हे लोकांना कळालं पाहिजे. त्यांचे जुने संबंध आहेत. अदानीच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

YouTube video player

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. लोकशाहीवर हल्ला होत आहे. आमचा फक्त एकच सवाल केला आहे. अदानीची शेल कंपनी आहे. त्यात 20 हजार कोटी कोणी गुंतवले? ते अदानीचे पैसे नाहीत. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस आहे. पैसे इतरांचे आहेत. ते पैसे कुणाचे आहेत? मीडिया रिपोर्टमधून माहिती घेऊन मी संसदेत पुरावे दिले. मी अदानी आणि मोदी यांच्या संबंधावर भाष्य केलं. दोघांचे संबंध जुने आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांचे नाते आहे. त्यांच्या संबंधाचे फोटो दाखवले आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

20 हजार कोटी कुणाचे आहेत?

विदेशी शक्तींची मदत घेतली नाही. चुकीचा समज केला जात आहे. माझं म्हणणं क्लिअर कट आहे. मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं आहे. पण भाजपचे मंत्री सभागृहातही खोटं बोलत असतात. पण मी प्रश्न विचारणारच. मी घाबरत नाही. पद घालवून तुरुंगात टाकून मला शांत करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी शांत बसणार नाही. मी अदानी आणि मोदी संबंधावर बोलणारच. 20 हजार कोटी कुणाचे आहेत? हा सवाल मी करणारच. त्याचं उत्तर भाजपला द्यावच लागेल. हे पैसे नक्कीत अदानी यांचे नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

ओबीसींचा मुद्दा नाहीच

मी साडेचार महिने भारत जोडो यात्रेत लोकांसोबत होतो आणि राहणार. विरोधकांचं काम आहे लोकांमध्ये राहणार आहे, असं सांगतााच हे ओबीसींचं प्रकरण नाही. हे मोदी आणि अदानीच्या संबंधाचं प्रकरण आहे. 20 हजार कोटीचं प्रकरण आहे. अदानी यांना ही रक्कम कुठून आली? संरक्षण मंत्रालय याबाबत का बोलत नाही? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. भाजप लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम करत आहे. कधी ओबीसीच्या तर कधी धर्माच्या नावाने. भारत जोडो यात्रेतील माझं भाषण पाहा, त्यात मी सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाण्याचं वारंवार सांगितलं आहे. माझा मुद्दा क्लिअर आहे. हे आताचं प्रकरण हे फक्त 20 हजार कोटींचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.