नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (19 जानेवारी) पत्रकार परिषद घेत भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसला विचारलेल्या प्रश्नांबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी जेपी नड्डा यांच्यावरही टीका केली. जेपी नड्डा कोण आहेत? ते माझे प्रोफेसर आहेत का मी त्यांना उत्तर देत फिरु? असा खोचक सवाल राहुल गांधी यांनी केला (Rahul Gandhi slams J P Nadda).
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
“जेपी नड्डा माझे प्रोफेसर आहेत का ज्यांना मी उत्तर देत फिरु. मी देशाचे शेतकरी आणि जनतेला उत्तर देणार. मी त्यांचा आवाज उठवणार. कुणी कितीही टीका केली तरी मी लढणार”, असं राहुल गांधी म्हणाले (Rahul Gandhi slams J P Nadda).
संपूर्ण देश विरोधात गेला तरी मी सत्याच्या बाजून लढत राहील. मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही. मी स्वच्छ चारित्र्याचा आहे. हे लोक मला हात लावू शकत नाही. गोळी घालू शकतात ही दुसरी गोष्ट आहे. पण मी देशभक्त आहे. यांच्याविरोधात उभा राहणारच, असं त्यांनी सांगितलं. हे लोक शेतकऱ्यांना थकवू शकतात, पण त्यांना मूर्ख बनवू शकत नाहीत, असंही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा आंदोलनाचं सन्मानच करत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी बोललं तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. सत्ताधारी बोलताना कोणताही विचार करत नाहीत. संघाची त्यांना तशी शिकवणच आहे. मात्र, बोलण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
“यूपीए सरकार असताना शेतकऱ्यांचं लाखो-कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी झाली. शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील शेतकऱ्यांसोबत बातचित करण्याची इच्छा नाही. काँग्रेस पक्षाचा शेतकरी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत”, असंदेखील राहुल गांधी यावेळी म्हणाले.
जेपी नड्डा नेमकं काय म्हणाले होते?
जेपी नड्डा यांनी ट्विटरवर राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. “काँग्रेस शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम कधी थांबवणार आहे? युपीए सरकारद्वारे स्वामीनाथन रिपोर्टला का थांबवलं गेलं होतं? एमएसपीला लागू का केलं गेलं नाही? चीनच्या मुद्द्यावरुन काँग्रेस खोटं बोलणं कधी सोडणार?”, असे अनेक सवाल नड्डा यांनी ट्विटरवर केले होते.
I hope @RahulGandhi gathers the courage to answer these questions. If he doesn’t, I urge our hard-working media friends to ask him these questions.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 19, 2021
संबंधित बातमी :
मला हात लावू शकत नाहीत, गोळी घालू शकतात; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप