नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत आज प्रचंड आक्रमक बघायला मिळाले. त्यांनी लोकसभेत आपलं मत मांडताना मोदी सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार म्हणचजे हम दो, हमारे दो, असं सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ होताना दिसलं (Rahul Gandhi slams Modi government in Loksabha).
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
काही वर्षांपूर्वी कुटुंब नियोजनाचा एक नारा होता. हम दो, हमारे दो, असा तो नारा होता. कायद्याबाबत बोलतो. आज काय होतंय? जसा कोरोना दुसऱ्या रुपात येतोय, तसाच हा नारा आता दुसऱ्या रुपात येतोय. आज या देशाला फक्त चार लोक चालवतात. मी बजेटवर बोलतोय. हम दो और हमारे दो. नाव सर्वांना ठावूक आहे. पहिले कायद्याचा उद्देश सांगतो. आपल्या देशात एक फक्त सर्वात मोठा मित्र आहे. त्याला संपूर्ण देशात अन्नधान्य, फळ आणि भाजीपाला विकण्याचा अधिकार देण्यात यावा. हा आमच्या सरकारच्या पहिला उद्देश आहे.
नुकसान कुणाचं होणार? नुकसान हे देणाऱ्यांचं होईल. छोटे व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या लाखो लोकांचं प्रचंड नुकसान होईल. कायद्याचा उद्देश हा दुसऱ्या मित्राला पूर्ण देशात अन्नधान्य, फळे, भाजीपालांची मोनोपोली देण्याचा आहे.
पंतप्रधान म्हणतात मी पर्याय दिला आहे. हा तुम्ही तीन पर्याय दिले आहेत. त्यात पहिला पर्याय हा भूख, दुसरा पर्याय बेरोजगारी आहे.
हिंदुस्तानचा सर्वात मोठा व्यापार हा कृषीमालाचा आहे. 40 टक्के लोक यावर जगतात. 40 लाख कोटींचा यात व्यवसाय आहे. या व्यवसायात शेतकऱ्यांना थोडाफार फायदा मिळतो.
नव्या कृषी कायद्यांमुळे देशातल्या लोकांना उपाशी मरावं लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघणार. छोटे व्यापारी, दुकानदार संपणार. नोटबंदी हा पहिला हल्ला होता. गरीबांचा पैसा घेणं हाच नोटबंदीचा उद्देश होता. हा सगळा पैसा दोन व्यक्तींच्या घशात घातला. गब्बरसिंग टॅक्सनेही लोकांना लुटलं. देश फक्त 4 जण चालवतात. मी बजेटवर बोलणारच आहे, सध्या फाऊंडेशन बनवतोय.
उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. आता हा देश रोजगार निर्मिती करु शकत नाही. कारण देशाचा कणा तुम्ही मोडीत काढला. हे शेतकऱ्यांचं नाही देशाचं आंदोलन आहे. शेतकरी तर फक्त मार्ग दाखवतोय. संपूर्ण देश हम दो हमारे दो च्या विरोधात आवाज उठवतोय
शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला कायदे परत घ्यावेच लागतील.
शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींचं सभागृहात दोन मिनिट मौन
शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी यांनी सभागृहात दोन मिनिट मौन ठेवलं. मौन सुरु असतानाही सभागृहात मोठा गदारोळ झाला. दरम्यान, राहुल गांधींच्या कृतीवर लोकसभा सभापतींनी नाराजी व्यक्त केली. ही कृती उचित नसल्याचं सभापतींनी राहुल गांधींना सांगितलं.