‘आरक्षण संपवण्या’वरुन राहुल गांधी यांना भाजपने घेरले, पाहा काय दिले स्पष्टीकरण

| Updated on: Sep 11, 2024 | 9:48 PM

भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना सत्ताधाऱ्यांनी आता घेरलं आहे. राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याचं सतेत्तील नेत्यांचं म्हणणं आहे.

आरक्षण संपवण्यावरुन राहुल गांधी यांना भाजपने घेरले, पाहा काय दिले स्पष्टीकरण
Follow us on

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणावरुन राहुल गांधींनी धुवांधार प्रचार केला. मात्र आता अमेरिकेतल्या एका वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी घेरलं आहे. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. अमेरिकेतून राहुल गांधींनी आरक्षणावरुन हे वक्तव्य दिलं. आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार घेरलं. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना, राहुल गांधींनी आरक्षणावरुन भाष्य केलं. पण त्याचवेळी पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार केला जाईल हेही राहुल गांधी बोलले. विशेष म्हणजे, 4 महिन्यांआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाची प्रत दाखवून राहुल गांधी, मोदींवर आरक्षण संपवतील असा आरोप करत होते.

राहुल गांधींच्या या धुवांधार प्रचाराचा काँग्रेसला फायदाही झाला, पण आता आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यावरुन आता राहुल गांधींवर शिंदे फडणवीसही तुटून पडले आहेत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. मतांसाठी आरक्षणावरुन कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डीसीमधून स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, मी आरक्षणाच्या विरोधात नाही. सर्वांच्या सहभागासाठी आम्ही राजकारण करत आहोत.

राहुल गांधी यांनी पीएम मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की 2014 पासून भारताचे राजकीय चित्र बदलले आहे. राहुल गांधी म्हणाले की, 2014 पासून भारताने एका नव्या राजकीय युगात प्रवेश केला आहे. त्यांच्या मते हा टप्पा आक्रमकतेने आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारा आहे. राहुल गांधी यांनी ही लढत चुरशीची असल्याचेही म्हटले आहे.

आपल्या देशात आरक्षण हा विषय फार संवेदनशील आहे. त्यामुळं जेव्हाही आरक्षणावरुन उलटसुलट प्रतिक्रिया येतात. तेव्हा त्या त्या पक्षांना आणि सरकारांना त्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत. आता, राहुल गांधींवरुन आयतीच संधी सत्ताधाऱ्यांनाच मिळाली आहे. त्यामुळे राहुसल गांधी याला आता कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल.