नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) पत्र लिहिलं आहे. नव्या फॉलोअर्सला राहुल गांधी यांची प्रोफाईल दाखवण्यात येत नाही. हे सर्व मोदी सरकारच्या (Modi Government) दबावामुळं सुरु असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.ऑगस्ट 2021 मध्ये राहुल गांधी यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्यानंतर नव्या फॉलोअर्सची संख्या घटत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दबावात काम करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरला नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचं ट्विटरच्या निदर्शनास आणून दिलं आहे. सुरुवातील दरमहा राहुल गांधी यांच्या ट्विटरला फॉलो करणाऱ्यांची संख्या दरमहा 2.3 लाख होती. ती 6.5 लाखांवर पोहोचली होती. मात्र, ऑगस्ट 2021 नंतर ती संख्या दरमहा अडीच हजारांवर आली आहे. राहुल गांधींनी या काळात त्यांचे 19.5 दशलक्ष फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचं म्हटंल आहे.
राहुल गांधी यांनी ऑगस्ट 2021 अत्याचारग्रस्त पीडितेच्या कुटुंबाचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी ट्विटरकडे तक्रार केली होती. ट्विटरचे नियम राहुल गांधी यांनी मोडल्यानं त्यांचं अकाऊंट आठ दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आलं होतं. काँग्रेसनं त्या घटनेपासून राहुल गांधी यांच्या नव्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी हे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलं आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी पत्रकार परिषदेत काय बोलतात हे पाहून आम्ही निर्णय घेऊ, असं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या:
औरंगाबाद DMIC मध्ये फूडपार्कची दोन वर्षांपूर्वी घोषणा, अद्याप कामाला सुरुवात नाही, काय आहे कारण?
Nagpur NMC | करमाफीचा अधिकार मनपाला आहे काय?, तांत्रिक अडचणी तर नाहीत ना!
Rahul Gandhi wrote letter Twitter Ceo Parag Agrawal claim under govt pressure twitter limit his new followers