मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, राहुल शेवाळेंच्या नेतृत्वात शिंदे गटातील खासदार अमित शाहांच्या भेटीला

| Updated on: Aug 02, 2022 | 5:27 PM

राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी आम्ही केलीय. याबाबत प्रक्रिया पूर्ण करु, असं शाह यांनी सांगितलं आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, राहुल शेवाळेंच्या नेतृत्वात शिंदे गटातील खासदार अमित शाहांच्या भेटीला
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical language) दर्दा देण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. हीच मागणी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही खासदार आज राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीनंतर राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी आम्ही केलीय. याबाबत प्रक्रिया पूर्ण करु, असं शाह यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर आम्ही पुन्हा NDA सोबत आलो आहोत. राज्यातील जनतेला आता अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी केल्याचंही शेवाळे म्हणाले.

राहुल शेवाळेंची आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका

शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते असलेले राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या राज्यातील दौऱ्यावर टीका केलीय. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत मला माहिती नाही. पण या यात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. वरिष्ठ नेत्यांनी तशा सूचना दिल्याची माहणी आहे, अशी टीका शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय.

वन्यजीव संरक्षण कायदा आज संसदेत पारित

वन्यजीव संरक्षण कायदा आज संसदेत संमत झाला. या कायद्याला शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांचा पाठिंबा असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिलीय. मानव आणि प्राणी यांच्यातील तणाव आजही आहे. वन अधिकार कायद्याचे पालन केले जावे. मनुष्य वस्ती आणि पर्यावरण याचा विचार करता योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. वन्यजीव बोर्डाची बैठक लवकर बोलवावी आणि त्यात कमीत कमी 10 सदस्य असावेत, असावेत अशी अपेक्षाही राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलीय.

यांच्यात खरा मुख्यमंत्री कोण?; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. सावंतावाडीतून येत होतो त्या ठिकाणी मी पर्यटन फंड दिला होता. त्याला स्थगिती मिळाली आहे. आदिवासी खात्याच्या जीआरला स्थगिती मिळाली आहे. पण त्यातून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. पण स्थगिती द्यायला हे सरकार वैध आहे का? हे सरकार काळजीवाहू असेल तर ठिक आहे. पण ते किती घटनेला धरून आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.