Indian Railway Current Ticket Rules: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सुखकारक आणि स्वस्त असल्यामुळे अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे अनेक वेळा कठीण असतात. ऐनवेळी प्रवासाला जावे लागत असताना तत्काल तिकीट एक पर्याय असतो. परंतु तत्काल तिकीटही एक मिनिटांत बुक होतात. त्यानंतर आरक्षित तिकीट मिळवण्याचा काही मार्ग नसतो, असे अनेकांना वाटते. परंतु आरक्षित तिकीट मिळवण्याचा आणखी एक मार्ग त्यानंतर असतो. ट्रेन सुटण्याचा काही तासांपूर्वी आणि चार्ट लागल्यानंतर आरक्षित तिकीट मिळू शकते.
भारतीय रेल्वे प्रवाशांचा अनेक प्रकारचे सुविधा देते. अनेक प्रवाश्यांना अचानक जावे लागत असल्यामुळे तिकीट मिळत नाही. रेल्वे अशा प्रवाशांना करंट तिकीट बुकींगची सुविधा दिली आहे. सध्याच्या तिकीट सुविधेअंतर्गत ट्रेनमध्ये ज्या जागा रिक्त राहतात, त्यासाठी ही सुविधा दिली आहे. ही तिकिटे रेल्वे स्थानकातून गाड निघण्यापूर्वी चार्ट तयार झाल्यावर दिली जाते. रेल्वेच्या या सुविधेमुळे रेल्वेच्या महसुलातही वाढ होते. तसेच प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निश्चित सीट मिळते.
विशेष म्हणजे तत्काल तिकिटासाठी नेहमीच्या तिकीटापेक्षा जास्त पैसे भरावे लागतात. परंतु करंट तिकिटासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही. नेहमीच्या तिकीट दरात हे तिकीट मिळते. हे तिकीट तुम्ही रेल्वेच्या काऊंटवर जाऊन देखील तयार करु शकता.