Confirmed Ticket Rule IRCTC: भारतीय रेल्वेने नवीन नियम लागू करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे वेटींग तिकीट किंवा जनरल तिकीट असल्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवर लवकर प्रवेश मिळणार नाही. या प्रवाशांना रेल्वे येण्याच्या काही वेळेपूर्वीच प्रवेश मिळणार आहे. देशातील ६० रेल्वे स्टेशनवर ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही प्रणाली तयार केली आहे. नुकतेच दिल्ली स्टेशनवर गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली, आनंद विहार, सूरत, वाराणसी, अयोध्या आणि पटणा स्टेशनसह एकूण ६० स्टेशनवर ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. या सर्व स्टेशनची यादी अद्याप जाहीर झाली नाही. परंतु त्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड तयार केला आहे. या लोकांनी ड्रेससोबत आयकार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर केवळ व्हॅलिड लोकांनाच प्रवेश दिला जाईल. आपत्कालीन परिस्थितीत ड्रेसकोडमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची ओळख केली जाईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच रेल्वे स्टेशनवरील गर्दीच्या नियंत्रण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात ६० स्टेशनवर ही योजना राबण्यात येणार आहे. त्यानंतर टप्पा टप्प्याने देशातील सर्वच स्टेशनवर ही प्रणाली लागू होईल.
हे ही वाचा…
रेल्वेच्या प्रत्येक तिकीटधारकास किती मिळते ‘सबसिडी’? शेजारच्या देशांमध्ये किती आहे रेल्वे भाडे?