गोवा : गेला आठवडाभर कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सगळीकडे धबधबे वेगाने प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला गोव्यातील दूधसागर धबधब्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुसळधार पावसामुळे गोव्यातील दूधसागर धबधब्या(Dudhsagar waterfall)जवळून जाणारी रेल्वे थांबली. (Railway stops at Dudhsagar waterfall in Goa due to heavy rains, Railway Ministry shared video)
रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मांडोवी नदीवरील धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर ट्रेन थांबलेली दिसत आहे. दूधसागर धबधब्यात वाढलेला पाण्याचा प्रवाह रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. खरं तर दरवर्षी पावसाळ्यात दूधसागर किंवा ‘दूध का सागर’ या धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो, परिणामी पाण्याचा प्रचंड फवारा येतो. तसेच, दूधसागर धबधब्याच्या सभोवतालचा परिसर घनदाट जंगलांनी परिपूर्ण आहे आणि खूप समृद्ध जैवविविधता आहे.
दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्यात स्थित आहे आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी या धबधब्यात कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गोवा सरकारने धबधबा क्षेत्रात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. लॉकडाऊन असल्याने पर्यटकांना दूधसागर धरणावर पोहोचणे अशक्य झाले आहे.
दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे, याची उंची 310 मीटर आहे आणि सरासरी 30 मीटर रूंदी आहे. त्याचबरोबर मान्सूनमुळे कोकण आणि गोव्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि येत्या तीन दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केली आहे. 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान कार्यालयाने व्यक्त केली आहे. आयएमडीने या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Railway stops at Dudhsagar waterfall in Goa due to heavy rains, Railway Ministry shared video)
WATCH: A train passing through Doodhsagar waterfall in South Western Railway, halted due to heavy rainfall. @RailMinIndia pic.twitter.com/lrGbfPpYbd
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) July 28, 2021
इतर बातम्या
फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा ब्रॅण्डेड कंपन्यांचे एसी; जबरदस्त कूलिंगसह वीज बिलाचीही बचत होणार