RAC Ticket: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवाशी प्रवास करत असतात. तिकीट आरक्षित करुन प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही जणांचे तिकीट वेटींगवर असतात तर काहींना आरएसी तिकीट मिळते. आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना देण्यात न येणारी सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेंट आणि उशी दिली जात नव्हती. आता हे सर्व सामान आरएसी धारकांना मिळणार आहे.
आरएसी (Reservation Against Cancellation) तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. आता या प्रवाश्यांना कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे. कोच अटेंडेंट बर्थवर पोहचल्यावर प्रवाश्यांना बेडरोल देणार आहे. यामुळे कन्फर्म तिकीट धारक आणि आरएसी तिकीट धारक यांच्यातील भेदभाव संपणार आहे.
रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जातात. परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नाही. यासंदर्भात बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरएसी तिकीट धारकांना कन्फर्म तिकीट धारकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे. रेल्वेने आरक्षित शयनयान श्रेणीत वेटींग तिकीट असणाऱ्यांना प्रवाशांना बंदी केली आहे. कोणत्याही प्रकारच्या वेटींग तिकिटावर रेल्वेच्या आरक्षित कोचमधून प्रवास करत येत नाही.