केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सोशल मीडियावर चांगले सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक प्रकारची माहिती देत असतात. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओनंतर वैद्यकीय क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेक डॉक्टरांनी त्यावर आक्षेप नोंदवला. त्यामुळे अखेर अश्विनी वैष्णव यांना तो व्हिडिओ डिलिट करावा लागला. त्या व्हिडिओत टीटीई एका रेल्वे प्रवाश्याला सीपीआर (cardiopulmonary resuscitation) देत असल्याचे दिसत होते.
रेल्वेमंत्र्यांनी टीटीईचा टीटीईचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये एका ७० वर्षीय व्यक्तीला टीटीई सीपीआर देत असल्याचे दिसत होते. त्या वृद्धाला रेल्वेतच ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अश्निनी वैष्णव यांनी तो व्हिडिओ शेअर करत टीटीईला प्राण वाचवणारा व्यक्ती असल्याचे म्हटले होते.
With due respect, sir, it seems incorrect. It would have been better to get it checked by a doctor before posting.
— Shikhar Ganjoo, MD (@shikharganjoo) November 24, 2024
व्हिडिओत दिसणारा वयोवृद्ध व्यक्ती शुद्धीवर होता. परंतु ते चिंताग्रस्त दिसत होते. यानंतर टीटीईने त्यांना सीपीआर दिला. आम्रपाली एक्सप्रेसमधील ही घटना होती. त्या प्रवाशाला बिहारच्या छपरा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते. द लिव्हर डॉक या नावाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर सिरीयक एबी फिलिप्स यांनी हा व्हिडिओ हटवण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. शुद्धीवर असलेल्या रुग्णाला सीपीआर द्यायला नको होता. रेल्वे कर्मचारी रुग्णाचे नुकसान करत आहे. त्याची छाती दाबण्याची पद्धत चुकीची आहे. यामुळे त्या रुग्णाची श्वासोच्छवासाची शक्यता कमी होत आहे. तसेच, बरगड्या तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे छातीचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
Another embarrassment for our reel minister @AshwiniVaishnaw. Should have verified before posting! https://t.co/TCNMUEi51G pic.twitter.com/FK7hRGnm6Y
— Karthik (@karthikiyerks) November 25, 2024
अमेरिकन डॉक्टर सॅम घली म्हणाले, ‘मला तो व्हिडिओ पाहून विश्वासच बसत नाही. व्यक्ती शुद्धीवर आहे, तो तुमच्याशी बोलत आहे आणि त्याला तोंडातून सीपीआर दिले जात आहे. जेव्हा रुग्ण बेशुद्ध असेल आणि त्याचा श्वास आणि हृदयाचे ठोके बंद झाले असतील तेव्हाच सीपीआर द्यावा.’ तसेच सीपीआर सुरू होताच ट्रेन ताबडतोब थांबवायला हवी होती, असेही डॉक्टरांनी सुचवले. याव्यतिरिक्त, व्हिडिओमध्ये दाखवलेले माउथ-टू-माउथ प्रक्रिया केवळ रुग्ण बेशुद्ध असेल आणि श्वास घेत नसेल तरच केली पाहिजे.