भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या रोषानंतर, रेल्वेने शुक्रवारी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी ‘स्पेशल’ टॅग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आता कोविड महामारीपूर्वीच्या तिकिटांच्या किमती परत लागू केल्या जातील. पिटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाने सांगितले की, गाड्या आता त्यांच्या नियमित क्रमांकासह चालवल्या जातील आणि भाडे सामान्य ‘प्री-कोविड’ किमतींवर परत येईल. (Railways to drop ‘special train’ tag, revert to pre-COVID ticket prices)
भारतात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून रेल्वे फक्त विशेष गाड्या चालवत आहे. याची सुरुवात लांब पल्ल्याच्या गाड्यांपासून झाली आणि नंतर कमी पल्ल्याच्या प्रवासी सेवा सुरू करण्यात आल्या. लोकांना “इमरजंसी” कारणांसाठी प्रवास करता यावा या उद्देशाने सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. आणि इमरजंसी नसेल तर प्रवासापासून परावृत्त करण्यासाठी भाडे वाढ करण्यात आली होती. मात्र, ती भडे वाढ आजपर्यंत लागू आहे.
रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर, सर्व नियमित मेल/एक्स्प्रेस गाड्या या एमएसपीसी (मेल/एक्सप्रेस स्पेशल) आणि एचएसपी (हॉलिडे स्पेशल) म्हणून चालवल्या जात होत्या. आता हे निश्चित करण्यात आले आहे की एमएसपीसी आणि एचएसपी ट्रेन सेवांचा, ज्यांचा समावेश 2021 कामकाजाचे वेळापत्रकत आहे, त्या सेवा नियमित क्रमांकांसह आणि संबंधित ट्रेनच्या लागू असलेल्या भाड्यांसह ऑपरेट केल्या जातील.
मात्र, आदेशात विभागीय रेल्वेला त्यांच्या प्री-कोविड नियमित सेवांवर कधीपासून लागू करणे आवश्यक आहे त्याची निश्चीत तारीख दिलेली नाही.
हे ही वाचा –