शिमल्यावर निसर्ग कोपला… भुस्खलन, दरडी कोसळल्या, शिव मंदिर ढासळले, 21 भाविकांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली किती दबले?

| Updated on: Aug 14, 2023 | 12:20 PM

मंडी येथील नागचला येथे ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नाल्यातील संपूर्ण राडारोडा हायवेवर आला आहे. परिणामी हायवे बंद झाला आहे. हायवे बंद झाल्याने मंडी आणि कुल्लुचा संपर्क बंद झाला आहे.

शिमल्यावर निसर्ग कोपला... भुस्खलन, दरडी कोसळल्या, शिव मंदिर ढासळले, 21 भाविकांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली किती दबले?
Shiv Mandir collapses
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिमला | 14 ऑगस्ट 2023 : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगफुटी सदृश्य चित्र या दोन्ही देशात निर्माण झालं आहे. त्यामुळे हाहा:कार माजला आहे. शिमल्यात तर अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे भुस्खलन आणि दरडी कोसळल्या आहेत. भुस्खलन झाल्याने शिव मंदिर ढासळले आहेत. त्यामुळे 21 जणांचा मृत्यू झालं आहे. तर ढिगाऱ्याखाली 50 भाविक दबले आहेत. त्या आधी सोलनमध्ये ढगफुटी झाल्याने सात लोकांचा मृत्यू झाला होता. तर मंडीच्या पराशर बागी येथे पूल वाहून गेल्याने 250 लोक त्याखाली दबले होते. उत्तराखंडमधील मालदेवतामधील डेहराडून डिफेन्स महाविद्यालयाची इमारत ढासळली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोलन जिल्ह्यातील कंडाघाटमधील जडोंनमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे दोन घरे जमीनदोस्त झाली. त्यात सात लोकांचा मृत्यू झाला. मरणाऱ्यांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. तर दोन लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. शिमला येथील समरहिलमध्ये भुस्खलन झालं. त्यामुळे शिव मंदिर ढासळलं आहे. सकाळी या मंदिरात काही लोक पूजा करण्यासाठी आले होते. अचानक मंदिर ढासळल्याने 20 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यटा ठिकाणाहून 21 मृतदेह बाहेर काढल्याने मंदिराच्या ढिगाऱ्याखाली अधिक लोक दबल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

मंडी-कुल्लू हायवे बंद

मंडी येथील नागचला येथे ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नाल्यातील संपूर्ण राडारोडा हायवेवर आला आहे. परिणामी हायवे बंद झाला आहे. हायवे बंद झाल्याने मंडी आणि कुल्लुचा संपर्क बंद झाला आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने हायवेवरील राडारोडा उचलण्याचं काम सुरू आहे. याशिवाय नागचला येथील लोकांच्या घरात आणि दुकानातही पाणी शिरलं आहे. मात्र, फार नुकसान झालं नसल्याचं सांगितलं जात आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

शिमला
चंबा
कांगड़ा
कुल्लू
मंडी
लाहौल स्पीति
किन्नौर

हिमाचलमधील हालहवाल काय

अतिवृष्टी आणि पूर येणार असल्याने ऑरेंज अलर्ट जारी

सर्व शाला, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर

302 रस्ते वाहतुकीसाठी बंद

भुस्खलनामुळे 200 बसेस फसल्या

1184 ट्रान्सफॉर्मरमध्ये खराबी

ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने अनेक भागात ब्लॅक आऊट

उत्तराखंडमध्ये या जिल्ह्यांना रेड अलर्ट

डेहराडून
पौड़ी
चंपावत
टिहरी
नैनीताल
उधमसिंग नगर