लाहोर : राजस्थानमध्ये स्थायिक होण्याआधी मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये राहणाऱ्या अंजू थॉमसने पाकिस्तानी फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केलाय. याआधी तिने इस्लाम कबूल करुन आपल नाव फातिमा ठेवलं. खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या अपर दीर जिल्ह्याच्या न्यायालयात त्यांनी कायेदशीर निकाह केल्याच बोललं जातय.
सोशल मीडियावर दोघांच्या निकाहनाम्याच शपथपत्र व्हायरल झालय. अंजूने आपल्या मर्जीने इस्लाम स्वीकारल्याच आणि नसरुल्लाहला कायदेशीर पती म्हणून स्वीकारल्याच मान्य केलय.
अंजूने प्रतिज्ञापत्रात काय म्हटलय?
“फातिमा, दुख्तर अंजू पुत्री जी प्रसाद, फ्लॅट नंबर 704, टावर एस अलवर टेरा एलिगेंस भारत. माझं मागच नाव अंजू होतं. माझा ख्रिस्ती धर्माशी संबंध होता. मी माझ्या मर्जीने इस्लाम कबूल केलाय. यात कोणतीही जबरदस्ती झालेली नाही. मला नसरुल्लाह पसंत आहे. त्यासाठी मी माझा देश भारत सोडून पाकिस्तानला आली. साक्षीदारांमसोर मर्जीने नसरुल्लाह सोबत निकाह केलाय. 10 तोळे सोन आणि शरीयतने निकाह केलाय. नसरुल्लाह माझा कायदेशीर पती आहे. हे माझं वक्तव्य एकदम योग्य आहे. यात काही लपवलेलं नाहीय” असं व्हायरल झालेल्या अंजूच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे.
दोघांचे रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
मलकंद डिवीजनचे डीआयजी नासिर महमूद सत्ती यांनी अंजू आणि नसरुल्लाच्या निकाहची पुष्टी केलीय. इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या भारतीय महिलेच नाव फातिमा ठेवल्याच त्यांनी सांगितलं. मंगळवारी अंजू ऊर्फ फातिमाचे पाकिस्तानी नसरुल्लासोबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ड्रोन कॅमेऱ्या निसर्गसंपन्न भागात हे व्हिडिओ शूट करण्यात आले आहेत. प्री-वेडिंग शूट म्हणूनही या व्हिडिओकडे पाहिलं जातय.