Ram mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. भगवान श्रीरामल्ला विराजमान झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जे चमत्कार असल्याचं भाविक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक माकड या मंदिरात शिरले होते. त्यानंतर गाभाऱ्यात हे माकड जाऊन आल्यानंतर कोणाला ही त्रास न देता निघून देखील गेले.
रामलल्लाची मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी सांगितले की मी बनवलेली मूर्ती गर्भगृहाच्या आत गेल्यावर तिचे भाव बदलले आणि डोळे देखील बोलू लागले आहेत. अरुण योगी राज यांनी सांगितले की, गाभाऱ्याच्या बाहेर मूर्तीची प्रतिमा वेगळी होती, परंतु जेव्हा मूर्ती गर्भगृहात प्रवेश करण्यात आली तेव्हा तिची आभा बदलली. मलाही ते जाणवलं.
ते म्हणाले की, मी गर्भगृहात माझ्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनाही सांगितले होते की हा दैवी चमत्कार आहे की आणखी काही, परंतु मूर्तीमध्ये बदल झाला आहे. आता राम मंदिरात असं काही घडलं ज्याला लोक चमत्कार म्हणत आहेत. कारण एक पक्षी राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचला आणि रामलल्लाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालू लागला.
मंदिराच्या गर्भगृहात आलेला हा पक्षी दुसरा कोणी नसून पक्षाचा राजा गरुड होता. जो आपल्या भगवान श्री रामाच्या दर्शनासाठी आला होता. लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. गरुड देव भगवान श्री रामललाच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा घालत असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.