Ram Mandir : अयोध्येला जायचंय जाणून घ्या विमानचं तिकीच आणि हॉटेलचे रेट काय?

| Updated on: Jan 15, 2024 | 3:26 PM

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात श्री रामांच्या दर्शनासाठी भारतातील कानाकोपऱ्यातून लोकं अयोध्येला येण्यासाठी उत्सूक आहेत. अनेकांना राम मंदिरात येण्यासाठी येथील माहिती जाणून घ्यायची आहे. अयोध्येतील हॉटेलचे रेट आणि विमानाचे तिकीट दर प्रचंड पटीने वाढले आहे. जाणून घ्या किती आहेत २२ जानेवारीसाठीचे दर.

Ram Mandir : अयोध्येला जायचंय जाणून घ्या विमानचं तिकीच आणि हॉटेलचे रेट काय?
Follow us on

राम मंदिर : 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. (Ram Mandir Pran Pratistha) साठी काही दिवस बाकी राहिले आहेत. देशभरात उत्साह आहे. सगळ्यांनाच या कार्यक्रमाचा भाग होण्याची इच्छा आहे. पण काही लोकांनाच या दिवशी या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. २३ जानेवारीपासून सगळ्यांना राम मंदिरात दर्शन घेता येणार आहे. तुम्हाला जर राम मंदिरात येण्याची इच्छा असेल तर तुम्हाला या दिवशी किती खर्च होईल याचा अंंदाज घ्यावा लागेल. २२ तारखेला तर बुकींग आधीच फूल झाले आहे. अयोध्येला विमानसेवा देखील सुरु झाली आहे. त्यामुळे विमानाने देखील येथे पोहोचता येणार आहे.

ईज माय ट्रिप, थॉमस कुक आणि SOTC सारख्या कंपन्यांनी माहिती दिली आहे की २२ तारखेच्या कार्यक्रमासाठी लोकं लाखो रुपये देण्यासाठी ही तयार आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ६ ते ७ हजार लोकांना आमंत्रण पाठवले गेले आहे. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे.

विमानाचे टिकीच २० ते ३० हजारांवर

थॉमस कुक आणि SOTC कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलुरु, हैदराबाद आणि चेन्नई येथून अयोध्येला येण्यासाठी विमानाचे तिकीट 20,000 से 30,000 रुपये पर्यंत पोहोचले आहे. 22 जानेवारीच्या तुलनेत आधीच्या दिवशी २० जानेवारीला मुंबई ते अयोध्या एका बाजुचे विमान तिकीट 17,900 रुपये ते 24,600 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

21 जानेवारीसाठी नॉन स्टॉप विमानाचे दर 20,699 रुपये आहे. कोलकाता ते अयोध्येसाठी २० जानेवारी रोजी विमान तिकीट 19,456 रुपये ते 25,761 रुपये आहे. बंगळुरु ते अयोध्या 20 जानेवारीसाठी विमान तिकीट 23,152 रुपये ते 32,855 रुपये आहे.

एक रात्रीसाठी मोजावे लागणार 70,000 रुपये

ईज माय ट्रिपच्या माहितीनुसार, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जवळपास 7000 लोकं येणार असल्याची शक्यता आहे. यानंतर दुसऱ्या दिवसापासून 3 ते 5 लाख लोकं अयोध्येला येऊ शकतात. राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी आतापासूनचं हॉटेलचे बुकींग सुरु झाले आहे. ऑक्यूपेंसी रेट 80 से 100% पर्यंत पोहोचले आहे. काही हॉटेलमध्ये एका रात्रीचे दर ७० हजारावर पोहोचले आहेत.