Ayodhya Akshata : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले असून सोमवारी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती. तो दिवस अखेर जवळ आला आहे. भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे. राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील राम भक्तांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे. हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येत येणार आहेत. २२ जानेवारी रोजी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे.
सध्या घरोघरी जावून रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षत: देत आहेत. याच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिल जात आहे. पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, या अक्षत:चे करायचे काय.
भारतीय परंपरेनुसार, प्राचीन काळापासून लोकं त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षताचा वापर करत असत. लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक जण सोबत अक्षत: देतात. जे हळदीने रंगवलेले असतात. कारण हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षता वापरल्या जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहे. ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी देखील येतेय.
तुम्ही हे अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता. किंवा तुमच्या जवळच्या मंदिरात देखील जावून देवावर अर्पण करु शकता. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभकार्यात देखील त्याचा वापर करु शकता.
ज्यांच्या घरात विवाह होणार असेल. त्या अक्षतांमध्ये देखील हे अक्षता तुम्ही मिसळू शकता. या शिवाय औक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरु शकता.