Ram mandir : 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले होते. तेव्हापासून दररोज हजारो लोकं अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. भारतातूनच नाही तर परदेशातून देखील लोकं दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन.पी. सौद यांनी देखील आज अयोध्येत प्रभू रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यांनी पाच चंद्रभूषण देखील सोबत आणले आहेत जे ते रामलल्ला यांना समर्पित करणार आहेत. रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. परराष्ट्र मंत्री सौद आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले.
नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांचे अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. विमानतळावरून ते थेट श्री रामजन्मभूमी मंदिराकडे रवाना झाले. नेपाळचे परराष्ट्र मंत्री त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना सौद यांच्यासोबत दर्शनाला आले होते. अयोध्येला पोहोचल्यानंतर नेपाळचे परराष्ट्र मंत्री यांनी राम मंदिरात विशेष पूजा केली.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री सौद यांनी रामलल्लाला पाच प्रकारचे चांदीचे दागिने अर्पण केले. यामध्ये धनुष्य, गदा, गलाहार, हात आणि पायात घातण्यासाठी बांगड्या इत्यादींचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सौद हे नेपाळ सरकारचे पहिले मंत्री असतील जे अयोध्येला भेट देणार आहेत. रामलल्लाच्या दर्शनानंतर नेपाळचे परराष्ट्र मंत्री सरयूच्या काठावर होणाऱ्या संध्याकाळच्या आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. हनुमानगढी मंदिराला भेट देण्यासोबतच ते तेथील इतर ठिकाणांनाही भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी देशभरातील जवळपास सात हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर लगेचच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी रामल्लाचे दर्शन घेतले असून करोडो रुपयांचे दान आले आहे.
राम मंदिरात चार मोठ्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या हुंडीमध्ये लोकं दान देत आहेत. या शिवाय देणगी देण्यासाठी काऊंटर देखील या ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत.