Ram Mandir Pran Pratishtha | “आज अंतकरण, उल्हास, समाधान आणि कृतज्ञतेने भरलेलं आहे. ही केवळ एका मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा नाहीय. ही या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासच प्रतीक आहे. आज 500 वर्षानंतर हे शक्य झालं” असं गोविंद देवगिरी महाराज म्हणाले. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच भरभरुन कौतुक केलं. “हे देशाच नाही, विश्वाच सौभाग्य आहे, आज असा राजश्री आपल्साला प्राप्त झालाय. तुमच्या मंगलहातांनी प्राणप्रतिष्ठेचा विषय होता, ते स्वाभाविक आहे, मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं की, तुम्ही 20 दिवसांपूर्वी प्राण प्रतिष्ठेसाठी काय-काय अनुष्ठान कराव लागेल, याची नियमावली मागवली” असं गोविंद देवगिरी महाराज म्हणाले.
“देशातील राजकीय वातावरण असं आहे की, कोणी कसलही उद्घटन करुन जातो, त्यासाठी काय सिद्धी प्राप्त करावी लागणार, याचा विचार करत नाही. मोदींना तीन दिवस उपवास करायला सांगितलेला, तुम्ही 11 दिवस उपवास केला, उपवास सर्वात मोठा तप आहे असं महाभारतात म्हटलय. असा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळण ही सन्मानाची बाब आहे. तुम्ही 11 दिवस कडाक्याच्या थंडीत जमिनीवर झोपलात, ही मोठी गोष्ट आहे” असं गोविंद देवगिरी महाराज म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर मोदींची तुलना करताना गोविंद देवगिरी महाराज काय म्हणाले ?
“मला या परंपरेला बघून केवळ एका राजाची आठवण येतेय, त्या राजामध्ये हे सर्व गुण होते, त्या राजाच नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराज एकदा मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी शैलमला गेले होते. तीन दिवस त्यांनी उपवास केला. तीन दिवस ते शिव मंदिरात राहिले. महाराज म्हणाले मला राज्य करायच नाहीय, मला सन्यास घ्यायचा आहे. इतिहासातील हा विलक्षण प्रसंग आहे, मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलोय, मला परत नेऊ नका, त्यावेळी महाराजांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं. आज असाच महापुरुष आपल्याला मिळालाय. भगवती जगदंबेने हिमालयातून त्याला परत पाठवलय, जा भारतमातेची सेवा कर,. तुला भारताची सेवा करायची आहे. काही अशी स्थान असतात, जिथे आदराने आपलं मस्तक झुकतं. मला आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची आठवण येतेय. त्यांनी महाराजांच निश्चयाचा महामेरु अस वर्णन केलं होतं. आज आपल्याला असाच श्रीमंत योगी मिळालाय” असं गोविंद देवगिरी महाराज म्हणाले.