ram mandir pran pratishtha : आज संपूर्ण भारतात राममय वातावरण आहे. प्रभू राम यांचा जन्म अयोध्येत झाला… हे प्रत्येकाला माहिती आहे. पण एक जागा देखील आहे ज्याठिकाणी प्रभू राम यांना राजा ही पदवी दिली जाते. सध्या ज्या जागेची चर्चा रंगली आहे, ती जागा म्हणजे ओरछा… रामलला यांचा अयोध्येशी जितका अतूट संबंध आहे तितकाच त्यांचा ओरछाशी आहे. ओरछा शहरात प्रभू राम यांना समर्पित एक मंदिर आहे. ज्याला राजा रामचं मंदिर असं म्हणतात. देशातील हे एकमेव मंदिर आहे जिथे रामललाची राजा रामप्रमाणे पूजा केली जाते.
संपूर्ण जगात हे एकमेव मंदिर आहे जिथे पोलीस प्रभू राम यांना नमस्कार करतात आणि सलामी देतात. या मंदिराशी संबंधित आणखी काही खास गोष्टी आज जाणून घेऊ… मंदिरात तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश पोलीस ओरछाच्या राम राजा मंदिरात व्हीआयपी प्रोटोकॉलप्रमाणे पहारेकरी म्हणून तैनात असतात.
एवढंच नाही तर, मंदिरात राज राम यांना बंदुकीची सलामी दिली जाते. येथे पोलीस राजा राम यांना गार्ड ऑफ ऑनर देतात. ओरछा येथील राज राम मंदिरात पंतप्रधान, मुख्यमंत्री आले तरी त्यांनी सलामी दिली जात नाही. येथील राजा म्हणजे फक्त राम… अशी समज आहे… ओरछा येथील राज राम मंदिरात फक्त राम यांना सलामी देण्यात येते.
पुढे समोर आलेल्या माहितीनुसार, राजा राम दिवसा ओरछा येथे राहतात आणि रात्री आराम करण्यासाठी अयोध्येला जातात. मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू राम दिवसभराचं काम पूर्ण झाल्यानंतर, त्यांना अयोध्येला रवाना करण्याची तयारी केली जाते, अशीही एक धारणा आहे.
मंदिराय मोठ्या आनंदात आणि भक्तीभावाना आरती देखील केली जाते. त्यांची आरती तासनतास शंख, ढोल-ताशांच्या आवाजात केली जाते. आरतीनंतर पुजारी सिंहासनावर असलेल्या रामाला दिवा मानून पाटली हनुमानाकडे घेऊन जातात. तेथे प्रभू रामांना अयोध्येला घेऊन जा…. अशी विनंती हनुमान यांच्याकडे केली जाते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मंदिरात कोणीही बेल्ट घालून प्रवेश करू शकत नाही. कोणीही VIP सुरक्षा कर्मचारी येथून कोणतीही शस्त्रे घेऊन मंदिरात जाऊ शकत नाही. आज अयोध्येत प्रभू राम यांची प्राण प्रतिष्ठा होणार असल्यामुळे प्रभू यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात.