Ram mandir scam : राम मंदिराच्या भव्य उद्घाटनासाठी देशभरात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्ती २२ जानेवारीची वाट पाहत आहे. प्रभु रामावर जवळपास सर्वांची श्रद्धा आहे. सध्या रामभक्त अयोध्येला पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भक्तांना राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. पण ज्यांना आता जाता येत नाही ते प्रसाद कसा मागवायचा, आधी कुठे दर्शन घ्यायचे, अशा अनेक प्रश्नांबाबत गुगलवर सर्च करत आहेत. अशा परिस्थितीत या संधीचा काही समाजकंठक फायदा घेत आहेत. तुम्हाला लुटण्यासाठी घोटाळेबाजांनी नवी पद्धत सुरु केली आहे. ज्यामध्ये बनावट वेबसाइट आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे.
सध्या https://khadiorganic.com/ ही वेबसाइट खूप व्हायरल होत आहे. ते तुमच्या घरी रामलला प्रसाद पोहोचवतील असा दावा केला जात आहे. पण यातून तुमची फसवणूक होत आहे. या वेबसाईटवर सुरुवातीला मोफत प्रसाद मिळवण्याचा पर्याय दिला जात होता. तुम्ही त्यावर क्लिक करून प्रसाद निवडल्यास आणि चेकआउट केल्यास तुम्हाला ५१ रुपये द्यावे लागतील.
काही काळानंतर या वेबसाईटवर मोफत प्रसाद मिळवण्याचा पर्याय देण्यात आला ज्यामध्ये चेकआउटच्या वेळी तासांचा प्रतीक्षा कालावधी दर्शविला गेला. आता या वेबसाइटवर एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की मोठ्या ऑर्डरमुळे प्लॅटफॉर्म आणखी ऑर्डर घेऊ शकत नाही.
एका व्यक्तीने जर 51 रुपये प्रसादासाठी दिले असते, तर त्याला लाखो रुपयांचा फायदा झाला असेल. जर तुम्ही देखील या वेबसाईटवरुन मोफत प्रसाद मागवला असेल तर तुमची फसवणूक झाली आहे.
Scam alert on the name of Bhagwan Ram 🚨🚨
Here is the company that claimed to distribute free prasad of Ram Mandir for just 51₹ for shipping charges. 🧐
SS-1.
Few users pointed out whether it was possible and how they were doing it, I investigated myself and found out that… pic.twitter.com/VIgVUSYPKG— Paise Wala (@AmirLadka) January 13, 2024
सर्वांना मोफत प्रसाद मिळावा यासाठी कोणतीही वेबसाइट किंवा अशा कोणत्याही सेवेबाबत सरकारकडून कोणताही संदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा खोट्या अफवांपासून सावध राहा. कुठेही पैसे देऊ नका. यातून तुमची फसवणूक होऊ शकते.
देणगीसाठी कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअॅप किंवा इन्स्टाग्रामवर डोनेशनच्या नावाने येणाऱ्या अनेक लिंक्स व्हायरल होत आहेत, अशा परिस्थितीत लिंकची पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
दानासाठी राम मंदिराच्या अधिकृत वेबसाइटची मदत घ्या. https://srjbtkshetra.org/donation-options/ या लिंकवर जा. येथे तुम्हाला ऑनलाइन डोनेशनचा पर्याय मिळत आहे.