अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूजा पाच तास चालणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त असणार आहे. सकाळी 12:29 ते 12:30 दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे. 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांना सुरुवात झाली. हे कार्यक्रम 22 जानेवारीपर्यंत आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभास फक्त देशभरातून नाही विदेशातून आमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी 50 देशांचे प्रतिनिधी या समारंभास असणार आहे.
22 जानेवारी रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग यादिवशी आहे. त्यानंतर इंद्र योग आहे. ज्योतिषांच्या मते 22 जानेवारी ही कर्म द्वादशी आहे. ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथनात मदत केली.
ज्योतिषांच्या मते 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीरामांचा जन्म झाला.