Ramayana Circuit Train | एक्सप्रेसमध्ये भगव्या गणवेशातील वेटर्स, साधू भडकले, अखेर गणवेश बदलला

| Updated on: Nov 23, 2021 | 8:04 AM

रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये (Ramayana Circuit Train) सेवा देणाऱ्या वेटर्सना भगवा पोशाख दिल्याच्या कारणावरुन सुरू झालेला वाद आता संपुष्टात येताना दिसत आहे. उज्जैनच्या संतांच्या आक्षेपानंतर आयआरसीटीसीने रामायण एक्स्प्रेसमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या ड्रेसमध्ये बदल केला आहे. IRCTC ने सोमवारी संध्याकाळी ट्विट करुन याची माहिती दिली आणि नवीन ड्रेससह वेटर्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Ramayana Circuit Train | एक्सप्रेसमध्ये भगव्या गणवेशातील वेटर्स, साधू भडकले, अखेर गणवेश बदलला
IRCTC Waiters Uniform
Follow us on

नवी दिल्ली : रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये (Ramayana Circuit Train) सेवा देणाऱ्या वेटर्सना भगवा पोशाख दिल्याच्या कारणावरुन सुरू झालेला वाद आता संपुष्टात येताना दिसत आहे. उज्जैनच्या संतांच्या आक्षेपानंतर आयआरसीटीसीने रामायण एक्स्प्रेसमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या ड्रेसमध्ये बदल केला आहे. IRCTC ने सोमवारी संध्याकाळी ट्विट करुन याची माहिती दिली आणि नवीन ड्रेससह वेटर्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

अयोध्या-रामेश्वरम ट्रेनमध्ये भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा भांडी उचलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उज्जैनच्या संत समाजाने हा संतांचा अपमान असल्याचे म्हणत त्यावर आक्षेप घेतला होता. त्यावर रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले, तसेच रेल्वे थांबवण्याचा इशाराही देण्यात आला. उज्जैनमध्ये राहणाऱ्या उज्जैन आखाडा परिषदेनेही रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदवला होता. 12 डिसेंबरपासून सुरु होणारी पुढील गाडी थांबवण्याचा इशाराही संतांनी पत्रात दिला होता.

रेल्वे कर्मचाऱ्यांना भगवा पोशाख

संत समाजाच्या इशाऱ्यानंतर आयआरसीटीसीने सोमवारी संध्याकाळी रामायण एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काम करणाऱ्या वेटर्सचा गणवेश बदलला आहे. आयआरसीटीसीने ट्विट करून ही माहिती दिली आणि लिहिले, ‘रेल्वे कर्मचार्‍यांचा पोशाख व्यावसायिक गणवेशात बदलण्यात आला आहे.’

अयोध्या, चित्रकूटसह भगवान श्री राम यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी भारतीय रेल्वेने IRCTC च्या माध्यमातून रामायण एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे. धार्मिक यात्रेशी संबंधित या ट्रेनमध्ये भाविकांना जेवण हे ट्रेनच्या आतच दिलं जाईल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही लोक साधूंच्या वेशभूषेत दिसले होते, जे जेवण वाढत होते. दावा केला जात आहे की हा रामायण सर्किट ट्रेनचा व्हिडीओ आहे आणि हे सर्व ट्रेनचे वेटर आहेत. जे या गणवेशात प्रवाशांना जेवण आणि पाणी देत ​​आहेत. या व्हिडीओत दिसणाऱ्या वेटर्सच्या ड्रेसवर संतांनी प्रश्न उपस्थित केले होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय होते?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वेचे वेटर साधूंचे भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्ष माळ घालून जेवणाची भांडी उचलताना दिसत आहेत. हा अपमान असल्याचे उज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज म्हणाले होते. वेटर्सचा ड्रेस लवकरात लवकर बदलण्यात यावा, अन्यथा 12 डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनचा संत समाजातर्फे विरोध केला जाईल आणि हजारो हिंदूंच्या वतीने ट्रेनसमोर आंदोलन करण्यात येईल.

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरुन सुरू होणारी ही ट्रेन आपल्या 17 दिवसांच्या प्रवासात पर्यटकांना भगवान रामाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची भेट आणि दर्शन घडवते. ही ट्रेन 17 दिवसात 7500 किमीचा प्रवास करते.

संबंधित बातम्या :

तुम्ही एका महिन्यात 12 ट्रेन तिकीट करू शकता बुक, ही आहे पद्धत

IRCTC चा नवा उपक्रम, मुंबईत सेंट्रल रेल्वेस्थानकावर पॉड हॉटेल, कमी पैशात वायफाय, एसी रुमसारखी सुविधा