Parliament Monsoon Session: राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी

| Updated on: Jul 19, 2021 | 6:08 PM

पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. (Phone Taping Of Rahul Gandhi)

Parliament Monsoon Session: राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते
Follow us on

नवी दिल्ली: पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीच काँग्रेसने केली आहे. (Randeep Surjewala Attacks On Modi Government, Phone Taping Of Rahul Gandhi)

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार लोकशाही विरोधी आहे, असं सांगतानाच भाजपने आता आपलं नाव बदलून भारतीय जासूस पार्टी ठेवायला हवं, अशी खोचक टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांचीही हेरगिरी

यावेळी काँग्रेसने राहुल गांधींची हेरगिरी केल्याचा भाजपवर आरोप केला. केवळ राहुल गांधीच नव्हे तर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही हेरगिरी करण्यात आली आहे. राहुल गांधी, त्यांचा स्टाफ एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने त्यांचे केंद्रीय मंत्री, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची हेरगिरी केली. हे अतिरेकीपणाचं लक्षण नाही का?, असा सवाल सुरजेवाला यांनी केला. सुरजेवाला आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हेरगिरीचं प्रकरण पुढे आल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. शहा यांना गृहमंत्रीपदावरून बरखास्त केलं जावं, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

काँग्रेसचे सहा सवाल

>> भारतात मुख्य निवडणूक आयुक्त, राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते, कॅबिनेट मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींची हेरगिरी करणं देशद्रोहीपणा नाही का? राष्ट्रीय सुरक्षेशी चाललेला हा खेळ नाही का?

>> 2019च्या निवडणुकांपूर्वी मोदी-शहांनी हेरगिरी केली होती का?

>> भारत सरकारने इस्रायलचं हे सॉफ्टवेअर कधी खरेदी केलं? त्यासाठी परवानगी मोदींनी दिली की शहांनी? त्यासाठी किती खर्च आला?

>> 2019 ते 2021 दरम्यान मोदींनी याची माहिती होती तर शहा गप्प का बसले?

>> देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी शहांकडे आहे. मग शहांची हकालपट्टी का करू नये?

>> पंतप्रधानांच्या भूमिकेची चौकशी होऊ नये का? (Randeep Surjewala Attacks On Modi Government, Phone Taping Of Rahul Gandhi)

 

संबंधित बातम्या:

Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

300 भारतीयांची सरकारकडूनच हेरगिरी, 40 पत्रकारांचा समावेश, केंद्र सरकार म्हणतं आरोप निराधार, वाचा सविस्तर काय घडतंय? 

(Randeep Surjewala Attacks On Modi Government, Phone Taping Of Rahul Gandhi)