Delhi Crime : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केला, वाचा दिल्लीत काय घडले ?

| Updated on: Mar 04, 2022 | 8:48 PM

पीडित महिला पेशाने डॉक्टर आहे. पीडिता आरोपीला केशवपुरम परिसरात भेटायला गेल्यानंतर आरोपीने तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने जीव वाचवून कसाबसा तेथून पळ काढला आणि पोलिस ठाणे काढले. महिलेने पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.

Delhi Crime : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केला, वाचा दिल्लीत काय घडले ?
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नवी दिल्ली : शेअर ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री (Friendship) करत आधी महिलेचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर घरी बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर दिल्लीत उघडकीस आली आहे. बंबल अॅपच्या माध्यमातून आरोपीने तिच्याशी मैत्री केली. मग हळूहळू तिचा विश्वास संपादन करुन आपण अविवाहित असल्याचे भासवून तिला लग्नाची ऑफर दिली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडिता त्याने सांगितलेल्या पत्त्यावर त्याला भेटायला गेली. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत दुष्कर्म केले. याप्रकरणी पीडितेने केशवपुरम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Rape of a woman in Delhi by pretending to be in love)

पीडितेला खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केला

पीडित महिला पेशाने डॉक्टर आहे. पीडिता आरोपीला केशवपुरम परिसरात भेटायला गेल्यानंतर आरोपीने तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने जीव वाचवून कसाबसा तेथून पळ काढला आणि पोलिस ठाणे काढले. महिलेने पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, भेटीनंतर आरोपीने तिला एका खोलीत कोंडून जबरदस्तीने बलात्कार केला. पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये बलात्कार तसेच बळजबरी आणि अंतर्गत जखमांचीही पुष्टी झाली आहे.

येवल्यात भोंदूबाबाचा आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार

मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांच्या वर भोंदूबाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना येवला शहरात घडली आहे. या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुलीचं लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे, असं सांगत आईसह तिन्ही मुलींना पिण्याचे पाणी देऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार केला. याचा व्हिडीओ काढून आई व इतर दोन मुलींनवर भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी बलात्कार करून ब्लॅकमेल करत आतापर्यंत 8 लाख रुपये उकळले. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून यात भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे. (Rape of a woman in Delhi by pretending to be in love)

इतर बातम्या

‘शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधीच येणार नाही!’, तरुण शेतकऱ्यानं जीवनयात्रा संपवली

Video – Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद