नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी दोन हजाराच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. 30 एप्रिल 2023 पर्यंत 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. आता या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. परंतु त्या बँकेत जाऊन इतर नोटांप्रमाणे जमा केल्या जाणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया तयार केली आहे. एक फॉर्म तयार केला असून तो भरावा लागणार आहे.
काय करावे लागणार
दोन हजाराच्या नोटा 23 मे पासून बँकांमध्ये बदलण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे बँकांनी तयारी सुरू केली आहे. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी फक्त बँकिंग नियमांचे पालन करावे लागेल, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. RBI च्या म्हणण्यानुसार बँकेच्या शाखेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मचे स्वरूप आरबीआयने जारी केले आहे. विशेष म्हणजे केवळ 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लोकांना फॉर्म भरावा लागणार आहे. काळ्या पैशाला आळा घालणे हा या पाऊलाचा उद्देश आहे.
दोन हजारच्या नोट बदलताना हा फॉर्म भरावा लागणार
यांना फॉर्म भरण्याची गरज नाही
जर एखादी व्यक्ती त्याच्या खात्यात 2000 ची नोट जमा करत असेल तर त्याला फॉर्म भरण्याची गरज नाही. फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावा लागणार आहे. जर समजा तुम्ही ओळख म्हणून आधार कार्ड देत असाल तर तुम्हाला त्याचा नंबर फॉर्ममध्ये लिहावा लागेल. तसेच इतर कागदपत्रे दिल्यास त्याचा क्रमांक फॉर्मवर लिहिणे आवश्यक आहे.
नमूद करावयाच्या नोटांची संख्या
याशिवाय तुम्हाला 2000 रुपयांच्या किती नोटा बदलून घ्यायच्या आहेत आणि त्यांची किंमत किती आहे हे देखील फॉर्ममध्ये नमूद करावे लागेल. हा फॉर्म बँकांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फार्म भरल्यानंतरच कोणालाही 2000 रुपयांच्या नोटा बदता येणार आहे.
नोट बदलण्याची मर्यादा
23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोट बदलता येणार आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतो. एका वेळेस फक्त 20,000 रुपये बदलता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
हे ही वाचा
दोन हजाराची नोट बंदी अन् सोन्याची खरेदी वाढली, काय आहे समीकरण?
दोन हजाराच्या नोटबंदीचा परिणाम, साप्ताहिक सुट्टी रद्द, कामांचे तास 9 वरुन 11