मंगळवारी सोशल मीडियावरुन चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. ज्यात दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा समावेश आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांचे इमर्जन्सी लँडिंग केले. X वर चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी लगेचच अनेक विमानतळांवर विशेष दहशतवादविरोधी पाऊल उचलले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानांमध्ये अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचा ही समावेश आहे.
सोमवारी मुंबई येथून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, चौकशीअंती नंतर या धमक्या खोट्या असल्याचं समोर आलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्लाइट (QP 1373) आणि एअर इंडियाच्या दिल्ली ते शिकागो (AI 127) फ्लाइटसह चार विमानांना धोका लक्षात घेता. अयोध्या विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, स्पाइसजेट आणि आकसा एअरची विमाने सुरक्षितपणे उतरली आहेत. त्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान कॅनडाकडे वळवण्यात आले आहे. विमान वाहतूक सुरक्षा सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, सर्व बाबतीत खबरदारी घेतली जात आहे.
एक्सवरुन एअरलाइन्स आणि पोलिसांच्या हँडलला टॅग केले आणि दावा केला की या विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. सोमवारीही चार वेगवेगळ्या एक्स हँडलने मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. सुरक्षा आणि गुप्तचर संस्था, एअरलाइन्स आणि विमानतळ चालकांनी सोमवारी दहशतवादविरोधी सुरक्षा तपासणी केल्यानंतर संदेश बनावट असल्याचे घोषित केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने या धमक्यांमागील लोकांचा शोध घेण्यासाठी भारतीय सायबर सुरक्षा संस्था आणि पोलिसांची मदत घेतली आहे.