कन्नड सिनेमाचा सुपरस्टार दर्शन तुगुदीपा याने त्याचा फॅन रेणुका स्वामीची हत्या घडवून आणली. ही हत्या कशी करण्यात आली? नेमकं काय घडलं होतं? ही सर्व माहिती आता जगजाहीर झाली आहे. पण रेणुका स्वामीने दर्शनची पार्टनर आणि त्याची खास मैत्रीण अभिनेत्री पवित्रा गौडा हिला असा कोणता मेसेज पाठवला होता की ज्यामुळे या दोन्ही कलाकारांना स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं नाही. याचा खुलासाही कर्नाटक पोलिसांनी केला आहे. आता संदलवूड अभिनेता दर्शनला या प्रकरणातून वाचण्यासाठी वर पासून खालपर्यंत आणि आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कशी कशी सेटिंग लावावी लागली हे सुद्धा उघड झालं आहे.
दर्शना आणि पवित्रा दोघेही पोलिसांच्या कस्टडीत आहेत. पोलीस कोठडीत असताना सर्व सुविधा मिळत नाहीत. सार्वजनिक जीवनात जसं आपण नटूनथटून असतो, तसं इथे राहता येत नाही. या हत्येच्या प्रकरणात दोघांनाही मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. मुख्य आरोपींचे तर कोठडीत हाल होतात. टेन्शनमुळे माणूस आधीच गलितगात्र झालेला असतो. त्याला अन्न पाणीही गोड लागत नाही. आरोग्य बिघडतं. पण पवित्राला पाहून तिला असा काही त्रास असेल असं वाटत नाही. पोलीस कोठडीत पवित्रा लग्जरी लाईफशी कॉम्प्रमाईज करायला तयार नसल्याचं चित्र आहे. ती पोलीस कोठडीतच नाहीये अशा पद्धतीने तिचं वागणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप सुकलेला नाहीये. ओठांवरील लिपस्टिक गेलेली नाहीये. त्यामुळेच पवित्राला तुरुंगात सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत का? असा सवाल केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मर्डरप्रकरणामुळे पवित्राला काहीही दु:ख झालेलं नाही. तिला काहीही फरक पडलेला नाही. पोलीस कोठडीत असूनही ती लिपस्टिक वगैरे लावून असते. पूर्ण मेकअप करते. तिचे तसे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत किती तथ्य आहे माहीत नाही, पण फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोठडीत पवित्राला एवढी सुविधा कशी दिली जातेय? असा सवाल केला जात आहे. पोलिसांकडून या बाबतचा काहीच खुलासा झालेला नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला पोलीस सब इन्स्पेक्टरने पवित्राला मेकअप करण्याची सूट दिली होती. त्यामुळे डीसीपीने या महिला पोलिसाला नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितलं आहे. पवित्राला एवढं स्वातंत्र्य का दिलं गेलं? असा सवाल करण्यात आला आहे. पवित्राला टेन्शन फ्रि करण्याच्या नादात आता या महिला पोलिसाचं टेन्शन वाढलं आहे. कारण पोलीस ठाण्यातच कायदा धाब्यावर बसवला जात असल्याबद्दल आता वरिष्ठांना विचारणा केली जाऊ लागली आहे.
पवित्रा गौडाला 15 जून रोजी बंगळुरूमध्ये तिच्या घरी नेण्यात आलं होतं. डिटेल रेकॉर्ड करण्यासाठी पोलीस घेऊन गेले होते. पण घरून पोलीस कोठडीत जाताना पवित्रा लिपस्टिक लावून मेकअप करून हसत हसत घरातून बाहेर पडली होती. तो फोटोही तुफान व्हायरल झाला होता. पवित्राला या हत्या प्रकरणाचा काहीच पश्चात्ताप झाला नसल्याचं यावरून दिसून येतं.