नवी दिल्ली: पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले जात असून त्यांची हेरगिरी केली जात आहे, असा दावा करत विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. मात्र केंद्र सरकारने विरोधकांचा हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. (
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संसदेत या प्रश्नावर सरकारची भूमिका मांडली. डेटामध्ये फोन नंबर्स असल्याने त्यामुळे हॅक झाल्याचं स्पष्ट होत नाही, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. डेटामुळे सर्व्हिलान्स झालं हे स्पष्ट होत नाही. एनएसओनेही रिपोर्ट चुकीची आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी सर्व्हिलान्स प्रोटोकॉल्सची सखोल माहिती देतानाच कोणत्याही प्रकारे अवैध सर्व्हिलान्स करणं आपल्या सिस्टिममध्ये शक्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या फोन नंबरशी संबंधित लोकांची हेरगिरी केली जात आहे, असा आरोप आहे. मात्र, रिपोर्टनुसार, डेटातील एका फोन नंबरमुळे डिव्हाईस पेगासस इन्फेक्टेड होते किंवा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सिद्ध होत नाही, असं वैष्णव यांनी सांगितलं. आपल्या कायद्यात आणि मजबूत संस्थांमध्ये चौकशी आणि संतुलनासह कोणत्याही प्रकारची हेरगिरी शक्य नाही. भारतात त्याबाबतची चांगली प्रक्रिया आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षाच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक संचाराचं वैध हस्तक्षेप केला जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो. पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं.
2019 ला हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन फोनध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होतं, त्यावेळेस एक वेगळीच पद्धत अवलंबली होती. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक उणीव(BUG) शोधून काढली आणि त्याचाच फायदा घेत हॅकर्सनी नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. त्याच दरम्यान एका कोडद्वारे पेगाससला फोनमध्ये इन्स्टॉल केलं. (
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 July 2021https://t.co/0hgE5ApN0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
संबंधित बातम्या:
ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर
(