Republic Day 2022 Live Updates : राजपथावरील संचलन सोहळा संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा

| Updated on: Jan 26, 2022 | 3:48 PM

Republic Day Parade 2022, Flag Hosting Live Updates: आज आपल्या देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला नवी दिल्ली येथील राजपथावर सुरुवात होत आहे.

Republic Day 2022 Live Updates : राजपथावरील संचलन सोहळा संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा
Republic day ceremony
Follow us on

Republic Day Parade 2022, Flag Hosting Live Updates: आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं.   25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (Republic day of India) संचलन पार पडलं  आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (republic day parade) आज एक पीटी 76 टँक, एक सेंच्युरियन टँक, दोन एमबीटी अर्जुन एमके आय टँक, एक ओटी 62 टोपस कर्मी वाहक, बीएमपीचे दोन सैन्य लढाऊ वाहन असेल. पीटी 76, सेंच्युरियन टँख , ओटी 62 आणि 75/24 पॅक होवित्जर ने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 75/24 पॅक होवित्जर आणि दोन धनुष होवित्जर, पीएमस प्रणाली, एचटी-16, दोन तरण इलेक्ट्रिकॉनिक युद्ध प्रणाली आणि एक टायगर कॅट मिसाईल प्रणाली आणि आकाश प्रणाली देखील याद्वारे संचलन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत संचलन सुरु संपन्न झालं.

भारतीय हवाई दलाच्या साहसी प्रात्याक्षिकांनतर राष्ट्रगीतानं संचलन सोहळा संपन्न झाला. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित समुदायाला अभिवादन केलं. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित जनसुमदायाला अभिवादन करताना दिसून आलं.

Republic day 2022 26 january india  live updates rajpath parade celebrations covid restrictions president ramnath kovind Narendra Modi Maharashtra CM Uddhav Thackray

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jan 2022 12:18 PM (IST)

    प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राजपथावरील सोहळ्याचा समारोप

    भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनतर राष्ट्रगीतानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं करण्यात आलेल्या संचलनाचा  समारोप करण्यात आला.

  • 26 Jan 2022 12:12 PM (IST)

    म्ही वसुंधरा ! झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा, महाराष्ट्राच्या चित्ररथाचं दिमाखात दर्शन


  • 26 Jan 2022 12:11 PM (IST)

    राजपथावर स्त्री शक्तीचे प्रदर्शन,

    राजपथावर स्त्री शक्तीचे प्रदर्शन

  • 26 Jan 2022 12:06 PM (IST)

    भारतीय हवाई दलाची प्रात्याक्षिक

    भारतीय हवाई दलाची प्रात्याक्षिक

  • 26 Jan 2022 12:05 PM (IST)

    बीएसएफच्या महिला जवानांची मोटार सायकलवरील थरारक प्रात्याक्षिक

    बीएसएफच्या महिला जवानांची मोटार सायकल प्रात्याक्षिक, सीमा भवानी यांनी त्याचं नेतृत्त्व केलं.

  • 26 Jan 2022 11:47 AM (IST)

    राजपथावर नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचं दर्शन

    नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचं दर्शन राजपथावर घडवण्यात येत आहे. राजपथावरील या सादरीकरणात 480 कलाकार सहभागी झाले आहेत. वंदे भारतकडून सादरीकरण करण्यात येत आहे. राजपथावर भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिसून आलंय.

  • 26 Jan 2022 11:37 AM (IST)

    पंजाबच्या चित्ररथातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पंजाबचं योगदानाचं दर्शन

    पंजाबच्या चित्ररथातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पंजाबचं योगदान दर्शवणारा चित्ररथ सादर करण्यात आला.

  • 26 Jan 2022 11:35 AM (IST)

    जलजीवन मिशन मंत्रालयाच्या वतीनं पाण्याचं महत्तवं सांगणारा चित्ररथ

    जलजीवन मिशन मंत्रालयाच्या वतीनं पाण्याचं महत्तवं सांगणारा चित्ररथ सादर करण्यात आला. सीआरपीएफनं सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असणारा चित्ररथ सादर केला. तर, विधी व न्याय मंत्रालयानं सर्वांसाठी समान न्याय असल्याचं दर्शन घडवणारा चित्ररथ दाखवला.

  • 26 Jan 2022 11:26 AM (IST)

    उत्तर प्रदेशच्या झांकीतून भारताच्या 75 वर्षांच्या प्रगतीचं दर्शन

    उत्तर प्रदेशच्या झाकीतून भारताच्या 75 वर्षांच्या प्रगतीचं दर्शन घडवण्यात आलं आहे. याशिवाय काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं देखील दर्शन करण्यात आलं आहे.

  • 26 Jan 2022 11:23 AM (IST)

    छत्तीसगडच्या चित्ररथातून गोधन योजनेचं दर्शन

    छत्तीसगडच्या चित्ररथातून गोधन योजनेचं दर्शन घडवण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील जीवन चित्ररथातून मांडण्यात आलं आहे.

  • 26 Jan 2022 11:17 AM (IST)

    शीख लाईट एन्फंट्रीच्या पथकाचा संचलन सोहळ्यात सहभाग

    राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्त शीख लाईट एन्फंट्रीच्या पथकानं सहभाग घेतला. मनोज नरवणे हे या रेजिमेंटचे कर्नल आहेत.

  • 26 Jan 2022 11:04 AM (IST)

    सीआरपीएफच्या बँड पथकाकडून हम हे देश के रक्षकचा गजर

    सीआरपीएफच्या बँड पथकाकडून हम हे देश के रक्षकचा गजर

  • 26 Jan 2022 11:01 AM (IST)

    राजपथावर भारतीय हवाई दलाकडून आत्म निर्भर भारताचं दर्शन

  • 26 Jan 2022 11:00 AM (IST)

    भारतीय नौदलाच्या चित्ररथातून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षाचं दर्शन

    भारतीय नौदलाच्या चित्ररथातून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी माहिती देण्यात आली आहे.

  • 26 Jan 2022 10:55 AM (IST)

    जगातील एकमेव घोडदळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी

    जगातील एकमेव घोडदळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी

  • 26 Jan 2022 10:53 AM (IST)

    Republic Day : सेंच्युरियन टँकचं राजपथावर संचलन

    Republic Day : सेंच्युरियन टँकचं राजपथावर संचलन

  • 26 Jan 2022 10:52 AM (IST)

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते धव्जारोहण

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर ध्वजारोहण करण्यात आलं.

  • 26 Jan 2022 10:45 AM (IST)

    Republic Day Parade : फोर एमआय 17V5 हेलिकॉप्टरची साहसी प्रात्यक्षिक सादर