Republic Day 2024 | भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. कर्तव्य पथावर भारत आणि फ्रान्सचे राष्ट्रपती ‘पारंपरिक बग्गी’ मधून पोहोचले. 40 वर्षानंतर ही प्रथा पुन्हा सुरु होत आहे. दोन्ही देशाच्या प्रमुखांना प्रेसिडेंट बॉडीगार्ड (PBG) म्हणजे ‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक’ एस्कॉर्ट करणार. प्रजासत्ताक दिनाच या रेजिमेंटसाठी खास महत्त्व आहे. ‘राष्ट्रपती अंगरक्षक’ सेवेला 250 वर्ष पूर्ण झाली आहेत.
प्रेसिडेंट बॉडीगार्ड एका एलिट घोडेस्वारांची पलटन आहे. ज्येष्ठतेच्या हिशोबाने भारतीय सैन्यात प्रेसिडेंट बॉडीगार्ड सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे. भारताच्या राष्ट्रपतींना एस्कॉट करणं, त्यांची सुरक्षा हे यांचं मुख्य काम आहे. भारतीय सैन्यातील ही सर्वात जुनी रेजिमेंट आहे. 250 वर्षापूर्वी या रेजिमेंटची स्थापना कशी झाली? त्या बद्दल जाणून घेऊया.
प्रेसिडेंट बॉडीगार्ड पथकाची स्थापना कधी झाली?
गवर्नर-जनरलच्या संरक्षणासाठी प्रेसिडेंट बॉडीगार्डची स्थापना झाली होती. इंग्रज गर्वनर जनरल वॉरेन हेस्टिंगनने 1773 मध्ये आपल्या सुरक्षेसाठी वाराणसीत घोडेस्वारांच्या पथकाची स्थापना केली होती. याआधी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात घोडेस्वारांच पथक नव्हतं. हेस्टिंग्सने स्वत: मुगल हॉर्स, स्थानीय सरदारांनी बनवलेल्या पथकातून 50 सैनिकांना निवडलं होतं.
या युनिटचा पहिला कमांडर कोण?
वाराणसीच्या राजाने तत्कालीन गर्वनर जनरलला अतिरिक्त 50 सैनिक उपलब्ध करुन दिले होते. त्यानंतर या युनिटची ताकत वाढून 100 घोडेस्वार झाले. स्वीनी टून युनिटचा पहिला कमांडर होता. स्वीनी टून, ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी होता. युनिटच्या दुसऱ्या रँकवर लेफ्टनेंट सॅमुअल ब्लॅक होता. त्यावेळी यूनिटची संरचना अशा प्रकारची होती.
1 कॅप्टन
1 लेफ्टनेंट
4 सार्जेंट
6 दफादार
100 सैनिक
2 ट्रम्पेट वाजवणारा
1 नाळ बांधणारा
Delighted to present the Silver Trumpet and Trumpet Banner to the President’s Bodyguard. I congratulate the PBG for their excellent military traditions, professionalism and discipline in all their tasks. The nation is proud of them. pic.twitter.com/GqlGL1LvD8
— President of India (@rashtrapatibhvn) October 27, 2022
फाळणीनंतर प्रेसिडेंट बॉडीगार्डच विभाजन
1947 साली भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर प्रेसिडेंट बॉडीगार्डच विभाजन झालं होतं. 1950 साली भारताने गवर्नर जनरल बॉडीगार्ड हे नाव बदलून प्रेसिडेंट बॉडीगार्ड केल. युद्धाच्यावेळी या युनिटमध्ये BTR-80 वाहनांचा समावेश होतो. या रेजिमेंटमधील सैनिकांना पॅराट्रुपर्सची ट्रेनिंग देण्यात आली आहे. प्रेसिडेंट बॉडीगार्ड म्हणून खास क्षमता असलेल्या सैनिकांनाच निवडल जातं. अनेक निकष पार करावे लागतात. चांगली हाईट, बॉडी आणि घोडेस्वारीच कौशल्य पारंगत असलेल्या सैनिकांची निवड होते.